Featured

One chapter has closed…

I can’t say, you were my friend. Nor you were my best friend. You didn’t know all my secrets, but I have spent a very quality time with you. You were just cool. More than me, more than my sister. We had drinks together, we had vulgar talks together, we had danced together. I think all my attitude, my personality, I got from you. Yes, only we both are left handed in our home. You never allowed my entry in the kitchen except to eat. And now when I make food or a good food. Every time you used to ask me. like “What? Can you make roti? can you make this? can you make that? ” It’s been 7years for my marriage and still you ask me the same questions.

You were always with painted nails, proper dressed up and I have a habit of biting nails so, I don’t paint nails at all. Whenever I went home, you sat besides me and used to paint my nails. I liked that, no matter what colour was it. Your favourite passtime was south Indian movies and playing cards and you didn’t need any partner for that. One thing I learnt from you is to enjoy yourself, no matter where you are. Like me and Chaitali, you used to wakeup at 10 or 11 in the morning. This platform is just not enough to share my best memories with you. We had laughed like mads with each other. Me and Chaitali were your strong contenders for your bitching sessions about our mother. We enjoyed it a lot.

I will miss your Pohe. I always try to make it the way you do. It’s been 7 months, I hadn’t met you. Even you didn’t wait. You walked away. Last night I heard your voice. You were screaming in pain. I was helpless. I couldn’t do anything instead of crying. I am sorry, I couldn’t reach upto you. I feel so guilty. I must be there. I am sorry. I really wanted to be there with you and Chaitali but this situation… I couldn’t do anything. Atleast I am happy she was there till your last breathe. I am proud of her that she is my twin soul and we are from you. I hope your journey to infinity is peaceful. I hope you meet me again, I hope we share the same bond, same love again.

There were so many people taking care of you these years, so I actually never got a chance to tell you how much I care for you. Now that you have gone, these things don’t matter. I wish your soul will be at peaceful place somewhere there where no one will disturb you, no matter how much time you sleep, or while playing cards or while being your own. I miss you so much. you will be always there in my good memories and in awesome chapters of my life.

TO MY GRANDMOTHER!!

अनोळखी वाटा – भाग ६

डे ०२: 

आज कोणालाच उठण्याची घाई नव्हती. पळत पळत गाडी पकडायची नव्हती. ऑफिसचे प्रेसेंटेशन बनवायचे नव्हते. बॉसचा ओरडा खायचा नव्हता. सगळ्यांना आपापला वेळ हवा होता. मनाला वाटेल ते करायचं होतं. साडे दहा नंतर एकेकाची गुड मॉर्निंग होत होती.  

” ब्रेकफास्टचं काय करायचं? ” – मी  

” मी बनवू का? ” – स्वप्न्या  

” ही कला तुझ्यात आहे हे मला माहिती नव्हतं. ” – मी  

” चल चालतच जाऊ, सामान आणायला “ – स्वप्न्या 

” मी पण येतो ” – फट्टू  

” एक काम करा, स्वप्न्या तू ब्रंच बनव, ब्रेकफास्ट नको. एकदाच भरपेट होऊन जाईल ” – रुजू  

“कोणाची काही स्पेशल फर्माईश? ” – स्वप्न्या  

” पहिल्यांदा तुमचे कलागुण तर दाखवा. फर्माईश उद्या करतो. ” – विड 

स्वप्न्याला मदत करायला तर आम्ही होतोच. त्याने पास्ता, टोस्ट ब्रेड सँडविच, हाल्फ बॉईल्ड एग, सगळंच आमच्यासाठी तयार होतं.  

” तू कधी शिकला हे? ” – विड 

” आवडतं असंच मला अधेमधे बनवायला. ” – स्वप्न्या  

” घरच्यांनी लग्नासाठी मुली बघायला सुरुवात केली का? ” – रूजू  

” अरे माझं स्वप्न आहे, रिटायरमेंट नंतर मला खानावळ सुरु करायचीये. कॅफे किंवा रेस्टो नाही. खानावळ. घर का खाना. ” – स्वप्न्या  

” तुझ्यात इतकी अभिव्यक्ती असेल असं वाटलं नव्हतं. ” – मी  

” ये क्या होता है ? ” – नेहा  

” क्रिएटीव्हीटी ” – मी  

” हा ये बात तो सही है! लगा नही था रे !” – नेहा  

” आताच का नाही सुरुवात करत आहेस, थोडी थोडी? ” – रुजू  (स्वप्न्याकडे बघून ) 

” शक्यच नाही आहे. पण मला खूप मस्त वाटतंय. खूप महिन्यांनी असं काहीतरी बनवून. ” – स्वप्न्या  

” संध्याकाळ मस्त समुद्रावर घालवू. ” – विड 

“ ए सुन, तुने वो कल बॉक्सेस लाये ना, उसमेसे एक बिअर दे। ” – नेहा  

” पण तू अंघोळीला चालली आहेस ना ? ” – रुजू  

” यार मुझे बडा क्रेझ था, एक बार तो नाहते नाहते बिअर पिनी थी .” – नेहा  

” वैसे तो मुझे भी एक बार पॉटी करते करते बियर पीनी है।  ” – फट्टू  

” हाँ तो करले फिर, मैंने तो डिसाईड कर लिया है, जो चाहिए वो सब मैं करने वाली हूँ। वैसे भी घरपे जाके घरवाले शादी के पीछे पड़ेंगे।  बॉयफ्रेंड तो है नहीं और पता नहीं हसबंड ऐसे शौक पुरे करने देगा भी या नहीं। तो बस अभी करना है।  ” – नेहा 

” यार, तुम्हाला किती टेंशन असेल ना, लग्नानंतर सगळ कसं निभावून जाईल याचं. ” – विड 

” हो असतं ना, पण आई वडिलांना फक्त लग्नाची घाई. जेणेकरून त्यांना असं वाटतं की लग्नाच्या आधी आमच्या मुलीची व्हर्जिनिटी लूज नको व्हायला. ” – रुजू  

सगळे शांत.  

संध्याकाळी सगळेच वेळेत बीचवर जाण्यासाठी तयार होतात. रुजूने फ्ली मार्केट मधून घेतलेला वन पीस घातलेला असतो  आणि तिला पाहताच विडच्या मनाचे तार आपोआप वाजू लागतात. गाडीत जवळपास सगळ्यांची बसण्याची जागा ठरलेली असायची. पण आज गाडी विड चालवत होता आणि त्याचा आरसा रुजूवर येऊन थांबत होता.  

” अरे मागच्या गाड्या बघता बघता पुढच्या गाड्यांकडे पण लक्ष ठेव. ” – स्वप्न्या  

” माझं बरोबर लक्ष आहे रे. ” – विड  

आम्ही सगळे समुद्राजवळ वाळूत निवांत पडलो होतो. सगळे जण आपापला वयक्तित वेळ एन्जॉय करत होते. सहजच लक्ष गेलं तर फट्टू स्केचिंग करत होता.  

” वाह, मला वाटलं तू सोडून दिलंस. ” – मी  

“सोडूनच दिलं होतं. ” – फट्टू  

” सोडून दिलं असतंस तर स्केच बुक बॅग मध्ये टाकून आणली नसतीस. ” – मी  

” यार तू हमेशा ऐसे क्यू बात करती है? इट मेक्स मी थिंक. और मुझे नहीं सोचना है कुछ. मुझे मेरा गोल पता है. ” – फट्टू  

” अरे इतना क्यू सोच रहा, उसने सिर्फ तुझे डायलॉग फेक के मारा. ” – स्वप्न्या  

” चिल फट्टू. ” – नेहा  

नेहा बीचवर पडून स्वतःमध्येच गुंग होती. 

रुजू उठली आणि पाण्यात जाऊन फेरफटका मारत होती. थोड्यावेळाने विडसुद्धा गेला.  

” तू खूप सुंदर दिसतेयस आज. ” – विड  

” थँक यु. ” – रुजू  

दोघेही पाण्यातून चालत होते.  

” खरंच, म्हणजे हा रंग तुला खूप छान दिसतोय. ” – विड  

” थँक्स विड, आज काय इतकी माझी तारीफ करतोयस. ” – रुजू  

” सहजच आणि सॉरी, कालसाठी. ” – विड 

” काय चाललंय तुझं? सॉरी – थँक यु ? ते तर माझ्या डोक्यातून कधीच उतरून पण गेलं. ” – रुजू  

” बरं झालं ना, आपण सगळे एकत्र आलो. खूप मस्त वाटतंय. एकदम रिलॅक्सिंग. ” – विड 

” खरंच, असं वाटतंय ही वेळ संपूच नये. ” – रुजू 

सूर्यास्त होऊन अंधार पडेपर्यंत आम्ही बीचवरच होतो. नेहाने तिचा ब्लूटूथ स्पीकर आणला होता. त्यावर प्रत्येकाच्या आवडीचं गाणं, बारीबारीने वाजत होतं.  

” आज रूमवर जाता जाता पिण्यासाठी स्टॉक घेऊ. ” – विड 

” नो बिअर, ओन्ली व्हिस्की आणि व्होडका. ” – स्वप्न्या  

” यार स्वप्न्या, मतलब मेरेको लगा नहीं था! तू सबसे शरीफ बंदा था ! तू आया ही कैसे ट्रिप पे? ” – नेहा  

” यार ये क्या बात हुई? शरीफ बंदे कधीतरी दारू पीत नाहीत का? आणि बोक्याने सगळ्यात पाहिलं मलाच विचारलं होतं. मग मी येणारच ना! ” – स्वप्न्या  

” स्पेशल ट्रीटमेंट हा ! ” – नेहा  

या वाक्यावर तर स्वप्न्या खूपच भाव खात होता.  

” आज जेवण पण रूमवरच करूयात ना मग, पार्सल नेऊन. ” – रुजू  

फट्टू फार गहन विचारात होता.  

” क्या सोच रहा? ” – विड 

” आपल्याला प्लास्टिक किंवा कागदाचे ग्लासेस आणि प्लेट्स बाहेरून लेके जाने पडेंगे या हॉटेल में दे देंगे? – फट्टू  

त्याच्या या वाक्यावर सगळेच हसायला लागतात.  

“आजचीदारुपार्टी माझ्या तर्फे. माझं प्रमोशन झालंय. ” – स्वप्न्या 

“साल्या आणि तू हे आता सांग्तोयस. ” – विड 

” अरे, मी सांगणारच होतो. ” – स्वप्न्या  

” ठीक आहे मग आपण व्हिस्की ऐवजी स्कॉच घेऊ, जॅक डॅनियल आणि व्होडकामध्ये अबसोल्यूटली ऍबसॉल्यूट तर पाहिजेच. ” – विड 

” चल, तुम लोग भी क्या याद रखोगे. जे पाहिजे ते मागवा. ” – स्वप्न्या  

” सून एक काम कर, कल भी स्टॉक आजही भरके रख. ” – नेहा  

नेहा विडला सांगत होती. 

अनोळखी वाटा – भाग ५

आमच्या जाण्याचा दिवस ठरला होता. सगळ्यांची आवरा – आवरी सुरु होती. मी माझ्या डोक्यात आमचा प्लॅन तयार करत होते. स्वरक्षणासाठी आम्ही एक सूरी आणि दोरखंडही आम्ही घेऊन ठेवले. निघण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घरच्यांचे इंस्ट्रक्शन्स ऐकत होतो, आणि शेवटी आमच्या जाण्याचा दिवस उजाडला.  

०७ जून: 

ठरल्याप्रमाणे स्वप्न्या गाडी घेऊन मला भेटणार होता, पुढे आम्ही नेहाला घेतलं आणि रुजूकडे जाणार होतो, कारण रुजूचे बाबा तिला सोडायला येणार, आणि तेव्हा आम्ही दोघी दिसलोच पाहिजे, हे आम्हालाही माहित होतं. शेवटच्या टप्प्यात आम्हाला विडकडे जायचं होतं. सकाळचे सहा वाजले होते. एका हातात फोन सुरूच होता, जेणेकरून आम्हाला कळेल काय काय होतंय, विड रूममधून हळूच निघून दाराजवळ आला. घरी पूर्ण शांतता. त्याने हळूच लॅच उघडलं, दरवाजाची कडी काढली आणि दरवाजा उघडला तितक्यात, 

“कुठे जातोयस? ” – विडचे आई बाबा  

(त्याचं त्या क्षणी काय झालं माहित नाही पण आमच्या छातीत इथे धडधडायला लागलं होतं.) 

तो दोन मिनिट तसंच उभा राहिला.  

“आम्ही विचारलं कुठे जातोयस? ” – आई 

” अं… मी… मी ट्रिपला जातोय आणि थोडे दिवस घरी येणार नाही. ओके बाय. ” – विड 

घरच्यांना काही समजायच्या आतच तो घरातून पळाला आणि दहाव्या मजल्यावरून जिन्याने उतरत गाडीजवळ आला. आम्ही गाडी सुरु करून तो येईल त्या क्षणी निघण्याच्या बेतातच होतो. आम्ही निघालो पण काही क्षण सगळे शांत.  

” मला वाटतं, आपण सगळ्यांनी जाऊन एक चहा घेऊयात टपरीवर. ” – विड 

त्याच्या या वाक्यानंतर जणू काही सगळे भानावर आले आणि पुढचे पाच मिनिट, नुसते हसत होते. 

चहा पीत पीत सगळे घडल्या प्रकाराचं वर्णन आठवून हसत होते. पण मी मनात कुठेतरी विचार करत होते, काश फट्टू सुद्धा आमच्या सोबत आला असता. चहा पिऊन आम्ही निघणार तोच स्वप्न्याने मला जरा मागे वळून बघायला सांगितलं आणि डोळ्यांवर विश्वास न बसणारी गोष्ट घडली. माझ्यासमोर फट्टू उभा होता. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की तो त्याची बॅकपॅक घेऊन आमच्यासोबत येण्यासाठी निघाला होता.  

रुजू आणि नेहाला ही खरं वाटत नव्हतं की फट्टू आमच्या सोबत येतोय. शेवटच्या क्षणी का होईना पण आमचा ग्रुप पूर्ण झाला.  

” डार्लिंग कैसा लगा सरप्राईज ” – फट्टू  

” साले, तू कसा आलास? ” – मी  

” अरे बस क्या, मी नाय येनार तर कोन येणार ” – फट्टू  

” आपण सगळे एकत्र जातोय खूप मस्त वाटतंय. ” – रुजू  

” चला आता निघूया, पुढे उशीर होईल. ” – स्वप्न्या 

———————————————————————————————————— 

इतक्या दिवसांपासून प्लॅनिंग चाललेल्या आमच्या ट्रिपची सुरुवात तर खूप मस्त झाली. जून महिन्याची नुकतीच कुठे सुरुवात होती. मळभ आलेलं वातावरण आणि अचानक पण छोटीशी येणारी पावसाची सर मन सुखावत होती. बऱ्याच वर्षांच्या खूप साऱ्या गप्पा बाकी होत्या. 

” नेहा तू और रुजू पीछे बैठं जा. वैसे भी तुम दोनो इतनी छोटी हो की डिक्की मै भी बैठं जाओगे. ” – फट्टू  

” फट्टू मेरी सॅंडल देखी है? ” – नेहा  

” आणि तू तर काही बोलूच नकोस, शहाणा आधी तर येणार नव्हतास आणि आता हुशाऱ्या करतोयस. ” – रुजू  

” अरे मेरी माँ, मस्करी करतोय मी, काय तू पन. कहा बैठना है तुझें ? बैठं जा, जहाँ चाहिये वहा बैठं जा. ” – फट्टू  

” बोक्या तू पुढे बस, कारण आपण कुठे जाणारे हे फक्त सध्यातरी तुलाच माहितेय. ” – विड 

” ओके, एक शेवटची गोष्ट, आतासाठी सगळ्यांनी पाच पाच हजार ट्रिप काँट्रीब्युशन मला द्या. आपल्या ट्रिप चा सगळा खर्च पेट्रोल, खाणं – पिणं , टोल, राहणं, सगळं पकडून किती होईल त्याचा हिशोब शेवटी लावू. ” – मी  

” माने, पचास हजार देना है क्या? ” – नेहा  

” दुबई जाना है क्या? फाईव्ह थाऊसंड बोल रही वो. ” – स्वप्न्या  

” सून यार दस ले लेना बट हॉटेल ३ स्टार + ही चाहिये. ” – नेहा  

” हा तो एक काम कर, मेरे बाकी पाच नेहा से ले ले. ताज बूक करवा लू तेरे लिये? ( नेहा कडे बघून) ” – फट्टू  

“हा चालेल ना, पुढे पेट्रोल भरायला थांबू तेव्हाच एटीएम मधून काढून घेऊ.” – विड 

” मी आणलेच आहेत पाच हजार कॅश, हे घे माझे. ” – स्वप्न्या  

” मी सुद्धा आणलेयत. ” – रुजू 

” माझ्याकडे आमच्या तिघांचे आहेत. एकाने पेट्रोल भरा, दोघांनी कॅश द्या. ” – मी  

आम्ही गाडीकडे जायला निघालो तोच फट्टू येऊन खांद्यावर हात ठेऊन विचारायला लागला, 

” बोक्या तू आगे बैठेंगी म्हणजे काय आम्हाला किडनॅप करनार का? ” – फट्टू  

” तुला किडनॅप केल्यावर तसंही कोणाला काही फरक पडणार नाही. ” – मी  

फट्टूचा चेहरा लगेच उतरला, पण मी मस्करी करत होते.  

” वो भी सही है. ” – फट्टू  

” सॉरी मेरा वो मतलब नाही था” – मी  

” अरे तू क्यू सॉरी बोल रही, माहितेय मला. ” – फट्टू  

” निघायचं? ” – स्वप्न्या  

” सबसे पेहले ना, याला किडनॅप करा. ” – फट्टू  

” गणपती बाप्पा मोरया ” – रुजू  

आमची गाडी सरळ लोणावळ्याच्या दिशेने निघाली. हा आमच्या ट्रिप चा होता डे वन. 

डे १: 

सकाळी आठ वाजता आम्ही गाडी सुरु केली. अधे मध्ये थांबत पहिला मोठा स्टॉप हा आमचा कोल्हापूर होता. तिथे भरपेट जेवण झालं. सगळ्यांना वाटलं आज इथेच थांबायचंय तेव्हा मी त्यांना सांगितलं इथून अजून थोडी गाडी चालवून आपल्याला गोव्याला थांबायचंय. स्वप्न्याचं तोंड बघण्यासारखं होतं.  

” आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाणार हे मला माहिती तर होतं. पण पाहिल्याचं दिवशी नेशील. असं वाटलं नव्हतं. ” – स्वप्न्या  

” चल रे, सध्या तुला चिल करायची फार गरज आहे. ” – मी  

” राहायचं कुठे? ” – स्वप्न्या  

” आजतरी नॉर्थ गोआ, नक्कीच. ” – विड  

सगळे हसत होते.  

नऊ ते दहा तासांचा प्रवास करून आम्ही संध्याकाळी गोव्यात पोहोचलो. तिथे जाऊन हॉटेल शोधायचं होतं. आम्ही अपार्टमेंट निवडून त्यात राहायचं ठरवलं. 

आता सगळ्यात मोठा प्रश्न होता घरच्यांचा फोन आला तर त्यांना सांगायचं काय ?  

रुजूसाठी तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता.  

” मला वाटतं तू खरं सांगून टाक. ” – विड 

” इतकं सोपं नाहीये ते. ” – रुजू  

” खोटं बोलून प्रॉब्लेम्स सुटत नाही. ” – विड  

“अच्छा? मग तू का घरून लपून छपून आलास? ” – रुजू  

” अमिगोज, भांडू नका. ” – मी   

” एक काम कर, तू बोल दे हम मुंबई में हैं.” – नेहा  

” हा, मुंबई सांगणं चांगलं राहील. गडबड गोंधळ ऐकू आला, तरीही फरक पडणार नाही. ” – रुजू 

सगळे आवरून आपापल्या घरी फोन करून हॉलमध्ये जमा झाले.  

” तर मित्रांनो काय करायचे आहे पुढे? ” – स्वप्न्या  

” मला फ्ली मार्केट ला जायचंय आणि तिथून पुढे बीचसाईड रेस्टॉरंट ला जेवायला जाऊ. ” – परफेक्ट  

कार आमच्याकडे होतीच फक्त प्रत्येक ठिकाणी पार्किंग शोधण्याची पंचायत होती. रुजू बीचवर घालण्यासाठी मस्त मस्त वन पीस घेत होती. नेहाने आधीच इतकं सामान आणलं होतं की तिला अधिकचा रुमाल ठेवायला पण जागा नव्हती. तिथे एका ठिकाणी वेगवेगळ्या डायरी घेऊन एक माणूस विकायला बसला होता. मी त्याच्या इथे थांबले आणि डायरी बघायला लागले. सहजंच विचारलं तर सातशे रुपये म्हणाला आणि विकत घेण्यासाठी मागेच पडला. हो, नाही करत शेवटी मी दीडशे रुपयाला डायरी घेऊन निघाले. मस्त गार हवेत बीच टच रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवायला बसलो. वाळूतच टेबल आणि खुर्च्यांची सोय त्यांनी केली होती. त्यातच एखादी मेणबत्ती हवेचा रोख सांभाळत आपला प्रकाश फेकत उभी असते.  

” भैया बिअर बकेट लेके आना दो. बाकी थोडी देर बाद बताते है। ” – फट्टू  

(वेटरकडे हात दाखवत ) 

” मला पकडू नका यात ” – रुजू  

” ही आपली येस ट्रिप आहे. कोणीही नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही” – मी  

” मला वाटलं पण नव्हतं, आपण सगळे एकत्र खरंच या ट्रिपला येऊ. ” – रुजू  

” आना तो था ही सबको। बहोत कम लोग होते है जो रूटीन से खुश रहते है. नहीं तो चेंज सबको चाहिए रहता।” – नेहा 

” बदल जरुरी है। ” – विड 

” खरंच मी नुसता विचार करायचो, कधी मी बीचवर बसून शांतपणे बिअर पिणार? आणि आज माझा विचार सत्यात उतरतोय. ” – स्वप्न्या  

” यार एक बियर के बाद इतनी मराठी समझ नहीं आती। ” – नेहा  

रात्र आमच्या गप्पांमध्ये संपत होती. फट्टू शांत होता. निघताना हळूच रुजू विडला सॉरी म्हणाली. दिवसभराच्या प्रवासाने सगळेच दमले होते, सगळ्यांना आता गरज होती ती शांत झोपेची. 

REFLECTIONS by Shree Gurudev

( 5th June 1912 )

A summary method ought to be devised in order that no useless time might be spent with talkative persons. This can not be done unless one feels an absolute importance of time. It is only when we come to think our time to be precious, that we resent the slightest encroachment on it, & try to dismiss everything summarily when, on the other hand, we do not find our time to be precious, but, on the contrary, find it hang heavy on our hands, no question can arise as to how a method can be devised for using our time profitably. The fact is that we must feel our time to be precious, & must have perennial work to do; & then, we can devise methods for preventing the slightest encroachments on our time.

मराठी अनुवाद (संदर्भ: अंतरंगीचे तरंग, प्रा. सुरेश गजेंद्रगडकर

*आपल्याला आपल्या वेळेचे महत्व कळले पाहिजे.*

बडबड्या लोकांबरोबर वेळ वाया न घालवण्यासाठी काहीतरी निश्चित पद्धती शोधावयास हवी. वेळेचे महत्त्व निश्चितपणे पटल्याखेरीज हे कुणीही करणार नाही. आपला वेळ मूल्यवान आहे हे आपल्याला जेव्हा कळते तेव्हा आपण आपल्या वेळेवर दुसऱ्याचे थोडेही आक्रमण सहन करणार नाही आणि सर्व गोष्टी ताडकन टाकून दूर होऊ. तेच आपल्या वेळेची जर काहीच किंमत आपल्याला वाटत नसेल व तो कसा घालवावा असा आपल्याला प्रश्न असेल तर तो कुठल्या प्रकारे घालवल्यास फायदेशीर ठरेल हा प्रश्नच उद्भवत नाही. आपला वेळ आपल्याला अत्यंत बहुमोल वाटला पाहिजे व आपल्याला सतत करण्यासाठी काम असणे आवश्यक आहे हे सत्य आहे म्हणजे आपण आपल्या वेळेवरचे लहान अतिक्रमणही थांबवण्यासाठी पद्धती शोधून काढू.

                                                                        – Shree Gurudev R.D.RANADE

अनोळखी वाटा – भाग ४

आज सकाळी सकाळी मला रुजूकडे जायचं होतं. तिच्या घरी जाणं म्हणजे उलट उत्तर न करता आपलं म्हणणं पटवून देणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते.

(रुजूच्या घरी)

बोक्या – ऐक ना, मूड कसा आहे बाबांचा?

रुजू – ठीक आहे, पाठवतील असं वाटतंय, डोन्ट वरी, जास्त काही नाही विचारणार तुला. बरं ऐक, आपल्यासोबत मुलं येतायंत हे मी सांगितलंय आणि आपण महाराष्ट्र फिरायला जातोय. तू सांगितल्याप्रमाणे एखाद – दोन ट्रेक असतील.

(तितक्यात रुजूचे बाबा येतात.)

मी – ” नमस्ते काका ”

(ते हसतात आणि आपल्या खुर्चीवर येऊन बसतात.)

काका – ” काय कसं चाललंय तुझं? ”

मी – ” छान, हैदराबादला असते मी. आता इथे आलेय सुट्टीसाठी. ”

काका – ” आम्ही आमच्या रुजूला कधीच कधीच घरापासून दूर पाठवलं नाही. जे काय करायचं असेल ते इथेच राहून करायचं. ”

मी – ” माझ्या आई – बाबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना मी मुलगी आहे, म्हणून माझं टेन्शन कधीच नव्हतं कधी असलंच तर प्रेमापोटी.”

(ओह नो, मी हे काय बोलले. रुजूला आपल्याला न्यायचंय ट्रिपला. एका नजरेने मी तिच्याकडे पाहिलं, तिच्याही चेहऱ्यावर हेच हावभाव होते की मी हे काय बोलतेय? )

काकांनी रागाने एक कटाक्ष माझ्यावर टाकला.

काका – ” रूजू म्हणत होती, तुम्ही सगळे ट्रिपला जाणार आहात म्हणून? ”

मी – “अं हो, आम्ही प्लॅन करतोय. बरेच वर्ष झाले, सगळे एकत्र भेटले नाहीयेत. तेवढंच सगळ्यांचं भेटून होईल एकत्र. ”

काका – ” पुण्यातही भेटताच की तुम्ही? ”

मी – ” हो… पण सगळ्यांचं एकत्र भेटणं नाही होत ना! आणि तितका वेळही एकमेकांसोबत मिळत नाही. म्हणून विचार केला सोबत ट्रिपला जाऊ.”

काका – ” बरं मग कोण कोण आहेत तुमच्या सोबत? ”

मी – ” आम्ही कॉलेजचेच सगळे. विड, फट्टू, नेहा स्वप्न्या. ”

काका – ” विड?? हे कसलं नाव? ”

(रुजू मनात – बोक्या गप्प बस)

मी – ” नाही काका… ते असंच… पेट नेम. ”

(रुजूकडे पाहत, मी – सॉरी)

काका – “अस्सं… कुठे जाणार आहात तुम्ही? ”

मी – ” आम्ही महाराष्ट्रातच जायचा विचार करतोय. पुण्याच्या आसपासच. ”

काका – ” तुम्ही मुली आहात, आपल्या मर्यादा लक्षात ठेवा. आम्ही रुजूला नेहमी सांगत असतो, कोणालाही कोणत्याही कारणाने आपल्याला हात लावू द्यायचा नाही… मुलं काय मस्करीमध्येही, टाळी मारण्याचा उद्देशाने…

(काकांचं प्रवचन पुन्हा सुरु. हे प्रवचन सुरु झालं की रुजूलाच जास्त खजील झाल्यासारखं वाटायचं.)

मी – ” काका मी आहे तिच्यासोबत. तुम्ही काळजी नका करू. ”

काका – ” तुझाही नंबर मला देऊन ठेव. मी रोज फोन करेन.

मी – ” हो नक्कीच. ”

(आता यांच्यासमोर बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.)

“ओके काका, निघते मग मी. ”

काका – ” बरं चालेल. रुजूला सोडायला येईनच मी, तेव्हा भेटू. ”

(घरातून आम्ही दोघीही बाहेर पडलो.)

मी – ” अजून हे टॉर्चर असतं का घरी? ”

रुजू – ” मग काय यार, वैताग आहे नुसता. ”

मी – ” चल सोड, जाऊ दे. आपण जातोय हे काही कमी आहे का? फुल्ल धमाल करू. ”

रुजू – ” ए बोक्या, तुम्ही शॉपिंगला जाणार आहात ना! मी पण येईन. ”

मी – ” या रविवारीच जातोय. तयार राहा. मी फोन करेन. साधारण पुढच्या गुरुवारी आपण निघू, २ जूनला. ”

रुजू – ” आता एक आठवडा निघणं खरंच कठीण आहे. ”

मी – ” हो, मी पण वाट बघतेय. मी निघतेय आता. ”

……………………………………………………………………………………………………………………………………………………..

“फट्टू, मी बोलतेय. प्लिज चल ना, आता तर खरंच सगळेच तयार झालेयत ट्रिपला यायला. मला माहित नाही तुझी कोणाशी रेस सुरु आहे ज्यासाठी तू एक मिनिटही दवडत नाहीयेस पण खरंच एकदा ऐक आणि चल. काय माहित कदाचित तुलाच तुझं काहीतरी सापडेल. तुझ्यासाठी असलेलं. ” – मी

( एकाच ओघात मी इतकं सगळं बोलून गेले आणि पुढची दोन मिनिट शांतता )

” हो गया तेरा? साँस लेती हैं भी या नही? ” – फट्टू

” मी जे बोलतेय त्याकडे लक्ष दे ना! ” – मी

” अच्छा चल बता, नेहा भी आ रही क्या? और उसके हिल्स का क्या करेगी? ” – फट्टू

” तिला तर पहिल्यांदाच स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलीये, फक्त शूज घ्यायचेयत. ” – मी

” अच्छा है, उसको समझा नहीं तो पागल आएगी ऐसेही मुँह उठाके। चल थोड़ी देर बाद बात करता तुझसे। ” – फट्टू

फट्टू येण्याबद्दल सोडून बाकी सगळं बोलला. कसं समजाऊ याला येण्याबद्दल? चित्र तर हेच होतं की तो येणार नाही, पण तरीही मनातून कुठेतरी हेच वाटत होतं की शेवटच्या क्षणी तरी तो येईल. चला आपली जायची तयारी तर करावीच लागेल.

……………………………………………………………………………………………………………………………………………………..

इतके दिवस फोनवर बोलणं चाललेले आम्ही सगळे एकदा एकत्र भेटलोच. विडला काहीच घ्यायचे नव्हतं, पण त्याला पळवण्याबद्दल आम्हाला प्लँनिंग करायचं होतं. शिवाय ट्रिपला निघण्याची तारीखही सगळ्यांना सांगायची होती.

” बोक्या, कौनसे शूज लू मैं? ” – नेहा

” देखते है कुछ सस्ता सूंदर टिकाऊ। ” – मी

सगळ्यांची सगळी थोड्या – जास्त प्रमाणातली शॉपिंग झाली आणि आम्ही कॅफे कॉफी डे मध्ये बसून बाकी गोष्टी बोलायचं ठरवलं. आता आम्हाला हे परवडण्यासारखं होतं कारण सगळेच कमावते होते. कॉलेजमध्ये असताना यायच्या आधीही ४ -५ वेळा विचार केला जायचा, खिशाला परवडेल की नाही याचा. क्वचितच कधी आलो असेल आम्ही. आज बऱ्याच गप्पा रंगणार होत्या आणि बरंच प्लॅनिंगही होणार होतं.

” स्वप्न्या तू गाडीची सोय करू शकतोस का? ” – मी

” आता गाडी पण माझीच का? मी येतोय ते बास नाहीये का? ” – स्वप्न्या

” किती रडका आहे हा यार… ” – मी

” ए मेरे घर की गाडी पार्किंगसे चुरा के लेके जाए क्या? ” – नेहा

” तुझे पप्पा ना मिलिटरी मध्ये आहेत. आपण मोकळ्या हवेत नाही, हवालात जाऊ. ” – विड

आणि विड स्वतःच हसायला लागला. त्याच्या हसण्याची एक पद्धत होती, हे हे हे ने सुरुवात करून तोच जोरात हसायला लागायचा. कोणाला जोक आवडला नाही ना, तरी त्याचं हसणं बघून सगळ्यांना हसायला यायचं.

” माझे बाबा गाडी द्यायचा प्रश्नच येत नाही. ” – रुजू

” मी तर स्वतःच घरातून पळतोय, गाडी पण पळवली तर मग झालंच. हे हे हे हाहाहाहा… ” – विड

” माझे बाबा आता इथे नाहीयेत, नाहीतर माझीच गाडी घेतली असती ” – मी

” स्वप्न्या प्लिज घे ना गाडी, उगीच गाडीला एक्सट्रा पैसे जातील आपले. ” – रुजू

” अरे यार, तुम्ही मला खरंच मरवणार आहात. एकतर घरच्यांना नक्की कुठे जाणार, कुठे राहणार हे सांगणार नाही. बाप म्हणेल, याच्यापुढे मला तोंड दाखवू नको, नाहीतर मला तुम्हाला म्हणावं लागेल, तोंड दाखवू नका परत. ” – स्वप्न्या

” ठीक आहे, तू समोर आलास की मग तुला पार्श्वभाग दाखवतो. हे हे हे हाहाहाहा. ” – विड

आता तर सगळेच हसायला लागतात.

” ग्रेट गाडीचं तर झालं. बोक्या, फट्टू खरंच येत नाहीये? ” – रुजू

” अरे उसको क्या हुआ? क्यों नहीं आ रहा वो गधा? ” – नेहा

” मी खूप प्रयत्न केला. पण काहीच बोलला नाही. ” – मी

” मी सुद्धा फोन केलेला त्याला पण येण्याबद्दल काहीच नाही बोलला. ” – विड

 

अनोळखी वाटा – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

अनोळखी वाटा – भाग ३

( स्वप्न्या आणि मी )

एका कॉफी शॉप मध्ये आम्ही दोघं भेटलो होतो. इतक्या दिवसांच्या गप्पा बाकी होत्या. जवळपास एक-दीड वर्ष एकमेकांना भेटलो नव्हतो. थोडी स्टाईल किंवा वजन सोडता, आमच्यातली मैत्री आधीसारखीच होती. इतक्या वर्षांनी भेटूनही ‘ आता काय बोलू? ‘ किंवा संभाषण पुढे कसं सुरु ठेऊ, असा प्रश्न निर्माण झाला नाही. सांगायला आणि ऐकायला बरंच काही होतं.

” बोक्या तू यावेळी मला मारवणार आहेस. कुठे जायचं याचा पत्ता नाही. कधी जायचं माहित नाही. फक्त इतकंच माहितेय की गाडी काढून निघायचं. घरच्यांना मी असं सांगू का? एकतर आधीच माहितीयेत ना माझ्या घरचे? ” – स्वप्न्या

” तुझ्या घरचे काय, सगळ्यांच्या घरचे असेच असतात. फरक फक्त इतकाच आहे, माझ्या आईने आपल्या वयाप्रमाणे मला समजून घेतलं आणि संमत्ती दर्शवली. पण तुझ्या घरच्यांना ते नसेल समजत तर तुझंही काम आहे ना, ते समजावून सांगायचं. ” – मी

” अरे हो, एवढी चिडतेस कशाला, थंड घे. ” – स्वप्न्या

” पैशांचा प्रश्न आहे का? ” – मी

” वेडी आहेस का? मला जॉबमधून चांगली सॅलरी मिळते आणि तुला खरं सांगू, मी कुठेच पैसे उधळत नाही. स्वतःवर पण नाही. कमीत कमी गरजेच्या जितक्या वस्तू आहेत, तितकाच आणि तेवढ्यावरच खर्च करतो. ” – स्वप्न्या

” का? ” – मी

” कशावर आणि कशाला खर्च करू? आनंद मिळणार असेल, मला छान वाटणार असेल तर मी खर्च करेन ना! मी ऑफिस, काम आणि घर सोडून काहीच करत नाही. इथे तुमच्याबरोबर मी यायला तयार झालो कारण मला खूप छान वाटतं तुमच्याबरोबर. नेहमीच. ” – स्वप्न्या

” तू मग शनिवार – रविवारी काय करतोस? ” – मी

” ऑफिसचं काम आणि इथे तिथे काहीतरी. ” – स्वप्न्या

” स्वप्न्या, ज्या गोष्टींनी तुला छान वाटतं त्यांच्यासाठी शनिवार रविवार  ठेव ना! ” – मी

” वेळच नसतो गं. एकदा लॅपटॉपसमोर बसलं की दिवस कसा निघून जातो कळत सुद्धा नाही. बरं ते सोड. जमलं तर आपण निदान सुरुवातीचा तरी प्लॅन बनवूया का? तुझ्या डोक्यात नक्की काय आहे? ” – स्वप्न्या

” चल आता बसलोच आहोत, तर बनवूया प्लॅन. पण त्या आधी कॉफी घेऊयात. तसंही तुझ्याशी या बोअरिंग कामाच्या गप्पा मारून माझा घसा सुकलाय. ” – मी

” अच्छा आता बोअरिंग का? बरं…. ” – स्वप्न्या

” जा चल. उधळ आता थोडे पैसे, माझ्यासाठी मस्त कोल्ड कॉफी त्यावर क्रीम घेऊन ये आणि स्वतःसाठी काय हवं ते आणू शकतोस. ” – मी

स्वप्न्या कॉफी आणत होता तोपर्यंत मी स्वतःच्या डोक्यातला प्लॅन कागदावर उतरवत होते.

” बोक्या ही घे तुझी कॉफी. आता चाट. ” – स्वप्न्या

आमच्या बाजूला बसलेलं एक कपल आमच्याकडे बघून हसायला लागलं.

“काढ, सगळीकडे माझी इज्जत काढ.” – मी

“तू तरी बोलू नकोस. तुझे किस्से लोकांना सांगितले ना तर झालंच. शिवाय बोक्या तुझं नाव आहे म्हटल्यावर तू कॉफी चाटणारच ना! कशी ग अशी तू, अडाणी ” – स्वप्न्या

मी फक्त एक तिरकस कटाक्षाने त्याच्याकडे पाहत होते. अजून एक जरी शब्द हा जास्त बोलला असता तर मारच खाणार होता.

“स्वप्न्या लास्ट वॉर्निंग आहे, अजून एक शब्द बोल मग तुझ्या शर्टलाच कशी कॉफी प्यायला लावते बघ.” – मी

(माझ्या बोलण्याला काहीही किंमत न देता सरळ विषय बदलून)

“बरं, दाखव प्लॅन” – स्वप्न्या

“बघ, माझ्या विचाराप्रमाणे साधारण पुढच्या दहा दिवसांनी आपण इथून कार घेऊन निघायचं. कार कोणाला एकालाच चालवावी लागणार नाही कारण आपल्याकडे बरेच चालक आहेत. जसा की तू, विड, कधी कधी फट्टू आणि शेवटी उरले मी. जून महिना आपल्यासाठी योग्य असेल कारण वातावरणात गारवाही असेल आणि पाऊसही म्हणावा तितका जास्त नसेल.” – मी

“कोणकोणती ठिकाणं साधारण तू विचार करतेयस?” – स्वप्न्या

“लोणावळा,कर्जत, भंडारदरा, इगतपुरी, नाशिक, वेल्हा आणि बाकी बघूया. तू सांग” – मी

“आपण नाशिक ला थांबणार आहोतच ना?” – स्वप्न्या

“हो, तुझं विशेष काय काम आहे?” – मी

“सुला….” – स्वप्न्या

“वाह! हे कधीपासून?” – मी

“हल्ली हल्लीच गं, ऑफिसच्या पार्टीजमध्ये” – स्वप्न्या

“मग तर घरी यायलाच पाहिजे, काकूंची परवानगी घ्यायला ट्रीपसाठी” – मी

“बास का! मी केलं का असं कधी काही तुझ्या घरी !” – स्वप्न्या

“तू काय करणार? मी स्वतःच सांगितलंय घरी” – मी

“काय राव, तुझ्यासारखं लाईफ पाहिजे.” – स्वप्न्या

“बरं चल निघू आता. मला उद्या सकाळ-सकाळी रुजूच्या घरी जायचंय.” – मी

“रॅम्बोची परवानगी घ्यायला?” – स्वप्न्या

“हो. बाबा रॅम्बो हो म्हणू दे म्हणजे झालं, नाहीतर तिला घरातून पळवणं खूप कठीण आहे.” – मी

https://wanderingequators.wordpress.com/2018/05/10/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be-1/

(Anolakhi Waataa – Bhaag 1)

https://wanderingequators.wordpress.com/2018/06/28/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be-2/

(Anolakhi Waataa – Bhaag 2)

Beach Destinations – Shrivardhan, Diveagar, Harihareshwar

Many of my friends from Pune and Mumbai always prefer to plan their weekend trip in Konkan. The beautiful beaches, lush green hills, curvy roads, smiley people and a variety of fishes in lunch and dinner… What else you need to spend a perfect weekend gateway?  I was always fascinated with this equation, but kept it postponed every time as it is my native place. But this time I determined to plan a trip in Konkan. Anyhow and finally, the day had arrived. I planned a weekend trip of 2 days with bucket list points to see, and places where I can eat fresh fish. Starting from Shrivardhan which is followed by Diveaagar and then Harihareshwar.

IMG_0205

How to go? 

Easiest and best way to reach Shrivardhan is by road. Shrivardhan is 189 km from Mumbai and it is 157 km Via Tahmini ghat and 212 km via Khopoli-pen road from Pune.

I had started my journey from Pune. Both the roads were equally horrible with potholes and road reconstruction was in progress. Maharashtra state transport local buses are also available from Mumbai and Pune, once you reach in Shrivardhan Town, you can explore nearby destinations by Auto rickshaw. You need to be a genius at bargaining skill with auto drivers.

  • SHRIVARDHAN

It was noon, till the time we reach Shrivardhan. We checked in to hotel and went in search of a Tasty fish thali. Later we visited Peshwa smarak, Somja devi temple, LakshmiNarayan temple and Shrivardhan beach.

Shrivardhan is a hometown and birthplace of Peshwa Balaji Vishwanath. Today the peshwa smarak temple is situated centrally in the town. The landmark is in the state of neglect and there is only statue of Peshwa and nothing else.

Shrivardhan beach is what every sea lover looking for. Calm beach with an empty and long stretch of a black sand. There are no water sports, and yet very few tourists visit here. A long walkway adjacent to beach sand has made by the government and also there are sitting arrangements at intervals. The beach and walkway both are very clean. Walkway also has many viewpoints. One can spend a relaxing evening on this beach.

  • Diveagar

Day 2 early morning, we left for Diveagar. Enroute to Diveagar there is aaravi beach, also known as kondivalli beach. You just cannot miss this beach. The drive along the sea is so satisfying.

Diveagar is most popular for the Ganpati idol of pure gold. You can also visit Rupanarayan temple.

unnamed (2)

Supari (Betel Nut) orchards and coconut groves that part to make way for the isolated beach. But now a days this is not at all an isolated beach. I had visited this beach in the morning around 8, even though it was busy by throng.

unnamed (1)

There are stalls at the entry of beach where they serve omelette bread, Maggi, Konkan special Ukadicha Modak, Tea and other snacks items. This beach provides water sports activities such as Parasailing, Banana ride, boat ride etc. You can also enjoy a horse cart riding on the beach.

This slideshow requires JavaScript.

  • HARIHARESHWAR

Harihareshwar is popularly known for its temple. Harihareshwar temple is always crowded by tourists. This sacred place has huge mythological history and very much of the importance. The parikrama route starts behind the temple. One need to first reach Ganesh Gully, from where you can step down and complete the parikrama by walking around rocky coastal hilly area. It can be very dangerous during high tide. Later you can spend time at harihareshwar beach.

  • Where to Eat?

Around all the three places, Shrivardhan, Harihareshwar and Diveagar, there are a number of small hotels and Khanawal available but at some places specially for home cooked food, you need to tell them in advance.

  • Shrivardhan – In the town there are a number of restaurants, who serves fish thali.We had visited KOKAN KINARA for lunch and hotel PRASAD for DInner. Both are recommended to visit in town. Must Try: Prawns Masala from Kokan Kinara and Fish Thali at hotel Prasad.

IMG_0227IMG_0245IMG_0246

  • Harihareshwar – Shiv Sagar caterers are famous for their prawn masala and crab curry but here also you need to tell them in advance. Minimum 2 hours before. Also, you can check for Mohan Kutumbe Restaurant.

  • Where to Stay?

Harihareshwar, Diveagar are now popular tourist destinations. So, there are many home stays, budget hotels and very few options for luxury hotels available.

I had stayed at Hotel Sea Wind Resort. The hotel was superior and one of the best stay options into the meadow countryside. The hotel was well equipped with the pool, restaurant, spacious rooms and courteous staff. Besides the months of monsoon, Rest year the hotel is bit expensive for stay. They charge around 4,500 to 5,000/- per night on weekends.

This slideshow requires JavaScript.

This short trip gifted me immense pleasure and peace of mind in these two days. The relax evening walk at the beach side, the energetic morning with sea shores and adventurous sea parikrama, having mythological importance were unforgettable memories of my trip.  One should definitely think about these places for a weekend trip or short family outing. My journey to Shrivardhan, Diveagar and Harihareshwar connected me with my town, my native place.

 

New Girl in The City – Ahmedabad

This time, our trio was fully set for our next expedition to a cotton city of India on the banks of sabarmati – yes, it’s Ahmedabad. We planned our trip in perfect season of July month, where it was neither too rainy nor too hot. A great weather, the way I like, mostly cloudy but slightly drizzling.

IMG-20180721-WA0007

Our journey started with BOM – AMD Air India flight. It was already scheduled at 01:30am, but did you know when it actually fly? 03:30 am. 2 hours of flight delay made us too much exhausted and added more frustration when we just kept awaited to pick our luggage for another one more hour. After the whole night excursion, we finally reach our hotel in morning – ” TREATOTEL HOTEL “. As per hotel policy, we reached early than check in time and they didn’t have any room available, so we slept at reception only. When housekeeping staff made our room ready, they dared to break our sound sleep and handed over room keys. Our tour driver came to hotel to greet us at 10:00 am, so we had our perfect power nap by that time.

Day 01: We started our first day in Ahmedabad with a local breakfast at Lakxmi Gathiya. It was a stall on the roadside, where we got Phaphda, Khandavi, Dhokala, Dalwada, Jalebi. The day plan was to visit Anand, which is popularly known for Amul factory.

IMG_1546

A 77 km distance from Ahmedabad took us to Anand. Dr Verghese Kurien started a white revolution in India from this place. Timing to visit the dairy is between afternoon 02 to 04 pm which doesn’t require any prior permission. We just have to show our ID proof to get an entry.  they started program with 10 min short film, explaining the inspiration behind revolution the revolution. Do you guys know the full form of Amul? It is – “Anand Milk Union Limited”. Further, during the visit, they explained the functioning of machines. Now their bigger plant is at Gandhinagar. They have Amul parlour in premises where you can get a large variety of Amul products.

IMG_1545IMG_1547

The evening was free to visit Sabarmati riverfront park. I found Ahmedabad very calm and peaceful. It was bit humid, but I was enjoying it. You can have a long walk in this park. Bhakti wanted to try Segway in this park but I and Ashu were niche interested. She convinced us a lot and finally she decided to do it alone. But by this time, raining had been started and segway operator boy said, ” It is closed, we can not operate now. ” Ohh no….. Bhakti gave us a very sarcastic look and we decided wherever we find it next, we will buy ticket for her.

It was almost 7 in the evening, that means it was time to taste local delicacies again. We went to law garden road. The street had numerous food stalls on its both sides. Looking out these many options, you would definitely get confused about where to go? Everyone there call you to visit their own stall, so we randomly went to one of the stall. We had Gujrat’s famous Kacchi Dabeli and I also wanted to try for another famous dish pav bhaji, but we wanted to keep more  space in stomach for dinner. Please do not forget to try Ashrafi kulfi & ice cream.

IMG-20180721-WA0029IMG-20180721-WA0030

Gujrat is always famous for it’s Khakra and you must visit ‘Induben ni Khakra’, when you are in Ahmedabad. It is hardly 5 to 10min walking distance from Law garden road. It is a big shop having a number of variety khakras. You would get chholapuri, chat, pizza, schezwan, diet khakra, plain khakra and many more. You just name a khakra and you would find it here. Our first day ends with Khakra shopping and we came back to our hotel.

Our hotel experience was not good this time. Room was small and food was so basic in taste. The most important thing is that, the phone in our room was ringing for whole night. We didn’t feel safe and we made complaint at reception on next morning immediately, but they had their framed answers ready. ” It has reported first time. our hotel is safe for girls. We have many solo travellers. Blah… Blah… Blah… ”

Day 02: After the horrifying night, we started our next day with Akshardham temple visit. No mobile phones, no bags, nothing was allowed inside… except your wallet. One needs at least 2 to 3 hours to visit Akshardham temple. It is located in Gandhinagar. I was visiting Akshardham for the first time; so when I entered into temple, it reminded me about the set of Bahubali movie. The architecture of the temple was so amazing. I wished, I could have a camera with me. It is a 3 storey temple of Yogiji Swami. Each element of Akshardham echoes with spirituality. You can explore temple area right from Mandir, Exhibition and Garden. Behind the temple, there is a canteen where you can have your meals. Later we proceeded to visit Sabarmati Ashram. On the way, we visited “Adlaj Vav”, which is a 3 storey well with indo – Islamic architecture and design. No entry ticket is required and it is open from morning 06:00 am to 06:00 pm.

IMG_1579

It is the most popular destination on the way from Gandhinagar to Ahmedabad.

This slideshow requires JavaScript.

Further we proceeded to Sabarmati Ashram.

IMG_1583

On the entrance, Ashram map welcomes you. There is a museum, where you would get information about various moments in Gandhiji’s life.

IMG_1609

Further they have library, photo gallery, Gandhiji’s prarthana bhoomi, his personal room where ashram has preserved his charkha, Hridaykunj, Vinoba-Meera Kutir. In the end, they have a museum shop where you can get related books, postcards, fridge magnets, handmade diaries and many other things. Visiting Sabarmati ashram was very inspirational.

This slideshow requires JavaScript.

Travelling in Ahmedabad is quite easy. It is well connected via BRT buses. Also auto rickshaw travel is also economical. Our last destination in this trip was Kankaria lake. This lake helps ecotourism of Ahmedabad. The lake has total 8 gates for entry and exit. surrounding the lake, they have well maintained path and place to sit everywhere. Many activities have been operated around the lake. you can well spend your evening here.

This slideshow requires JavaScript.

Bhakti finally got her segway here and of-course she did it. There is also a toy train for children, a zoo and lot of street food stalls. You can enter from any gate and take exit from other gate. It is best place to enjoy walk. There is also a water and light show in the evening. This was a last point before we headed to airport for back to Mumbai, but if you have one more day then do not forget to visit ‘Jama Masjid’.

It was a pleasant visit with lot of unforgettable memories. Even though Ahmedabad has emerged as one of the fastest growing city in India as economic and industrial hub, it has still continues its long history with several markets for best fabrics and clothing and of course delicious eateries. Therefore this city, “The Manchester of East” has to be on must visit on your travel list. The city attraction of mine will be continue and I will be meeting you in another city soon.

Sawai Madhopur Tour – Rajasthan

Visiting Rajsthan in the months of winter always fascinates me. It had been 2 years I am visiting Rajsthan in winters. Temperature is 28 degree to 12 degree, and is a nice weather to shoot wildlife. I had 2 days plan, one day Sawai Madhopur and another day Ranathambore Jungle safari. In this blog, I will put amazing scenery and natural beauty of Sawai Madhopur.

IMG_3695

For Ranathambore Jungle safari, Sawai Madhopur is the nearest village. But now this village has number of hotels, resorts with different ranges of amounts suitable to your pocket. We had our stay at Shergarh Resort. It was a very nice and clean and I found it one of the best property within 3 star hotels. Staff is courteous and food was very delicious.

This slideshow requires JavaScript.

Ranathambore fort is one of the main attraction of Sawai Madhopur after jungle safari. It requires 1 to 2 hours to explore the fort and surrounding wildlife.

IMG_3703IMG_3593

IMG_3587

IMG_3623

IMG_3676

A well spent evening at Ranthambore fort and we were prepared for next day adventure of jungle safari. Our day ends with amazing view from fort, cold weather, tapri wali chai, a visit to handloom showroom and delicious food, bonfire and soothing music. What else we need to celebrate a day?

अनोळखी वाटा – #2

“ऑफिसमध्ये सगळं काही ठीक आहे ना?” – आई

” हो. का? ” – मी

” नाही, सहजंच. काही झालंय का ऑफिसमध्ये? म्हणून जॉब सोडलास का? ” – आई

” नाही गं. उलट सर थांबण्यासाठी सॅलरी वाढवण्याबद्दल पण विचारत होते. ” – मी

” मग बाकी काही? रूममेट्स बरोबर काही खटका उडालाय का? असं काही असेल तर तू एकटी फ्लॅट घेऊन राहिलीस तरी चालेल. ” – आई

” तुला आनंद नाही झालाय का, मी आलेय तर? ” – मी

” मी मूळ कारण विचारतेय. ” – आई ( जरा रागाऊनच बोलली )

” माझा मूळ स्वभाव माहित नाहीये का तुला? आणि रूममेट्स बरोबर भांडण व्हायला भक्ती, अश्विनीला ओळखत नाहीस का तू? माझ्यापेक्षा तुझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे ना. त्यांना खूप वाईट वाटलं माहितेय, मी त्यांना सोडून इथे आले. त्यामुळे असा विचार कधीच करू नकोस की आमच्यात काही वादावादी झालेयत. ” – मी

” मग काही मानसिक दडपण? ” – आई

” हे देवा ” – डोक्याला हात लावत मी आईकडे बघत होते.

गंमतीतच तिला म्हटलं,

” तू माझं लग्न करून देत नाहीयेस यापेक्षा आणखी कोणतं मानसिक दडपण असणार. आता तर सहाएक महिन्यांतून एखादा पांढरा केसही सापडतो. कोणाला सांगू माझं हे दुखं? ”

उत्तराच्या अपेक्षेत जशा सगळ्या  आया तीव्र कटाक्ष टाकतात, तसाच तिनेही टाकला,

” बरं ऐक, मला एकसुरीपणाचा कंटाळा येतो. चाळीस वर्ष एकाच ठिकाणी राहून एकच काम करण्यात, एकच पदार्थ खाण्यात, त्याच त्याच रस्त्यांवर चालण्यात मला काही विशेष आवड नाहीये . उद्या चाळीस वर्ष उलटल्यानंतर मला असं नाही म्हणायचंय, अरे चाळीस वर्ष कुठे सरली कळलंच नाही. ” – मी

” हे सगळे नखरे लग्न होईपर्यंत. नंतर सगळे बरोबर गुंतून जातात. ” – आई

” अजिबात नाही. माझ्यासारखाच एखादा वेडा भेटला तरंच लग्न करेन, नाहीतर मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. ” – मी

माझं हे भाषण आईला कितपत कळलं, समजलं, पटलं आणि झेपलं होतं माहित नाही. कारण त्यानंतर ती फक्त एकंच वाक्य म्हणाली,

” चल चहा बनवते तुझ्यासाठी. ”


ई-मेल करून तीन – चार दिवस झाले होते. अजून कोणाचं काहीच उत्तर आलं नव्हतं. ” वाचला असेल ना मेल त्यांनी? ” मी स्वतःलाच विचारात होते. त्यांना फोन करून मीच सांगू का, तुम्हाला ई-मेल केलाय तो वाचा म्हणून. कसं वाटेल ते? स्वप्न्याला फोन केला तर तो फ्रुस्ट्रेटेड इन्सान सगळ्यात पाहिलं म्हणेल, ” तुला काही कामं नाहीयेत. तुला काय तिथे बसून मेल लिहायला. ” आणि अशा पद्धतीने म्हणेल जसं की आम्हाला फुकटचं खिरापत वाटतात तसा पगार देतात.

तेवढयात फोन वाजयला लागला.

” शंभर वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुलाच फोन करणार होते. ” – मी

” ते सगळं ठीक आहे पण काय गं, ई-मेल लिहायच्या आधी दोन बाटल्या घेऊन बसलेलीस का? ” – स्वप्न्या

” केलास फोन केल्या केल्या अपमान. नशीब मी स्वतःहून फोन नाही केला. ” – मी

” अपमान?? तरी नशीब दोनच बाटल्या म्हणालो. चल सांग हा आता पटकन. ” – स्वप्न्या

” तुला काही गांभीर्य आहे का नाही? ई-मेल मध्ये लिहिलेला टॉपिक सिरीयस आहे आणि मी त्याबद्दल. ” – मी

” तू पुण्यात परत आलीस? ” – स्वप्न्या

” हो. त्यात काय इतकं? ” – मी

” येडीएस का तू? फिरायला जायला जॉब सोडून यायची काय गरज होती? ” – स्वप्न्या

” तू येडा आहेस. मी काय कायमचं पुण्यात नाही आलेय. तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम काय आहे, मी पुण्यात आलेय तर? जा तू तुझ्या कंपनीत कारकुनीच कर. बधीर झालयस त्याच्याने. मी काय बोलतेय कळतंच नाहीये तुला. ” – मी

” बास का! इतका पण अपमान केला नव्हता मी तुझा. ” – स्वप्न्या

” बरं, चल मग आता, तू येतोयस हे नक्की आहे ना! ” – मी

“ए थांब बाई. घरी फादरला पटवावं लागेल आधी. कोण कोण येणारे? आपण दोघंच जायचंय का? बोअर होईल अरे. अजून बाकी कोणाचा फोन आला का नाही? ” – स्वप्न्या

” किती रडतोस यार. बाकीच्यांना तयार करते मी. तू तुझ्या फादरला तयार कर आणि कोणाचाही फोन आला तर सांगायचं तू येतोयस माझ्यासोबत. ” – मी

” घरी काय सांगू, कुठे जातोय? इतके दिवस ट्रेकिंगला कोणीही सोडणार नाही. ” – स्वप्न्या

” बरं सांग मग महाराष्ट्र फिरायला जातोय. ” – मी

” अरे यार, तू मला मारवणार आहेस. ” – स्वप्न्या

” तसंही फार चांगलं जगत नाहीयेस. ठेव आता आणि जा, तुला तर दोघा दोघांची परवानगी घ्यायचीये. बाय. ” – मी

” चल बाय. ” – स्वप्न्या


” बोक्या काय, हे खरं आहे का? ” – रुजू

” काय? ” – मी

” हेच,ट्रिपचं? ” – रुजू

” हो मग काय, स्वप्न्या पण येतोय. चल ना, खूप वर्षांनी सगळे एकत्र असू. ” – मी

” बोक्या वेडी आहेस का तू? प्लॅनिंग काय, जायचं कुठे? राहायचं कुठे? आणि घरी काय सांगू कुठे जातोय? ” – रुजू

” ऐक, स्वप्न्याच्या घरी सांगणारे महाराष्ट्र फिरायला जातोय. तू पण तेच सांग. एखाद दोन ट्रेकिंग असतील. राहायची सोय हॉटेल्स मध्ये असेल. ” – मी

” माहितेय ना, घरी यावं लागेल तुला. ” – रुजू

” कधी येऊ बोल? मी पुण्यातच आहे. ” – मी

” कधी आलीस? बरं मी घरी आधी वातावरण निर्मिती करते, मग तुला सांगते यायला. ” – रुजू

” चालेल. स्वप्न्याला पण घेऊन येऊ का? ” – मी

” बोक्या, प्लॅन कॅन्सल करायचंय का? एकतर मुलं आहेत हेच त्यांना नीट समजावून सांगावं लागणारे. ” – रुजू

” हम्म्म्म, घरचे अजुनपण एकाच गोष्टीवर प्रवचन देतात का? ” – मी

” मी घरी थांबतंच नाही. आजकाल तर मुलं बघायचं नवीन फॅड डोक्यात घेतलंय. बरंय आपण जातोय, माझ्या डोक्याला शांती. ” – रुजू

” ऐक ना, विड शी बोलशील? ” – मी

” कॉन्फरेन्स करूयात रात्री. मी तुम्हाला दोघांना घेते कॉन्फरन्स मध्ये, मग बोलू. फट्टू आणि नेहाचं काय? ” – रुजू

” त्यांना कसं पटवायचं हे मला खूप चांगलं माहितेय. नेहाला तर इतकंच सांगायचं सगळे तयार आहेत ट्रीपला, आम्ही निघतोय. दुसऱ्याच दिवशी बॅग घेऊन माझ्या घरी येईल ती. ” – मी

” बरं चल, मला सांग त्या दोघांचं कसं होतंय. रात्री बोलू, मला आता लेक्चर घ्यायला जायचंय. ” – रुजू

” नक्कीच. बोलू रात्री. बाय ” – मी

” बाय. ” – रुजू


” हेलो ” – मी

” अरे बोक्या, कैसी हैं? ” – नेहा

” मैं ठीक हूँ. तू बता? ” – मी

” तेरा मेल पढ़ा. सचमे ऐसा कुछ प्लान कर रही है क्या? ” – नेहा

” हाँ यार, इसीलिये तो तुझे कॉल किया। सब लोग रेडी हैं आने के लिए. तू आ रही हैं ना? ” मी

“ये भी कोई पूछने वाली बात हैं? ऑफकोर्स। कहा कहा जाना हैं? वैसे मैं शॉपिंग कर लू.” – नेहा

” देख, कुछ भी नहीं लिया तूने तो भी चलेगा बस एक बॅकपॅक और एक अच्छे शूज लेना। ” – मी

” अरे देख़ मैं क्या क्या लेके आती. हाये, शॉपिंग जाना हैं. ” – नेहा

” मेरी माँ, तेरी बॅग तुझेही पकड़नी हैं. तो अपनी साईज़ और हाइट के हिसाब से लेना, जो भी ले रही. ” – मी

” ए सुन ना, तू आएगी क्या? मुझे मदद हो जाएगी और तुझे कुछ लेना होगा तो तेरा भी हो जाएगा। ” – नेहा

” उम्म्म… चालेल. येते मी. रविवारी जाऊया. ” – मी

” संडे को ना? ” – नेहा

” हा रे, संडे को ही. ” – मी


आता फक्त विड आणि फट्टू बाकी आहेत. या दोघांना कसं समजवायचं? यांचं तर नेहा सारखं पण नाही आहे, सगळे हो म्हटले कि लगेच सुटायचं. विडच्या घरचे… आणि फट्टू कोणाशी स्पर्धा करतोय काय माहिती? या दोघांचाही नकार आला तर बाकीचेही डळमळीत होतील. विडशी रुजूबरोबर बोलता येईल. फट्टूशी आपणच बोलूयात. तसं फट्टूला समजावणं सोपं आहे आणि विडला घरातून पळवणं.

रुजूला फोन केला, विडशी बोलण्याची ही योग्य वेळ आहे.

” हॅलो ” – रुजू

” हॅलो, होल्ड कर, विडला कॉन्फरेन्समध्ये घेते. ” – मी

” हॅलो ” – विड

” हॅलो, कसा आहेस? ” – मी

” यार, वर्कशॉप वर आहे. कसा असणार? पळून जावसं वाटतंय इथून. ” – विड

“मग मी पळवते तुला, पण त्याआधी रुजू दुसऱ्या लाईनवर आहे, तिलापण कनेक्ट करते. ” – मी

” हॅलो, बोक्या s s … ” – रुजू

” हा रुजू बोल, विडपण लाईनवर आहे. ” – मी

” विड, कसा आहेस? ” – रुजू

” वर्कशॉप वर आहे. ” – विड

” ओ ओ … समजलं कसा आहेस ते. ” – रुजू

“विड, मेल वाचलास? ” – मी

” हो, पण काही फायदा नाहीये. माझ्यात घरी विचारण्याची हिम्मत नाहीये आणि मला माहितेय, मी विचारलं, ते नाही म्हणाले तर माझ्यावर नजर ठेऊन राहतील, मी कुठे जातो, कुठे नाही यावर” – विड

” एकदा समजावून तर बघ. तू काय आता लहान आहेस का? कॉलेजपर्यंत ठीक होतं. आता काय अरे? काय बरोबर, काय चुकीचं इतकं कळण्याइतपत आपण नक्कीच मोठे झालो आहोत. ” – रुजू

” स्वप्न्या, रुजू, नेहा, मी नक्की आहोत. ” – मी

” बोक्या ??…. ” – रुजू

” अरे रुजू, फक्त  तुझ्या घरी जाऊन सांगायचंय, जायचं तर नक्की आहेच ना !! ” – मी

” विड तुझ्याकडे दोनच पर्याय आहेत. घरी सांग नाहीतर घरी सांगू नकोस. ” – मी

” तसं असेल तर मी घरी सांगणारंच नाही. ” – विड

” म्हणजे तू येतोयस ? ” – रुजू

” तुम्ही सगळे जाताय म्हटल्यावर प्रश्न आहे का  हा! पण जायचंय कुठे? ” – विड

” ते आपण जायच्या आधी एकदा ठरवू भेटून. ” – मी

” विड पण घरी निदान लेटर लिहून ठेव जेणेकरून त्यांना असं नाही वाटणार की तुला कोणीतरी उचलून घेऊन गेलंय. ” – रुजू

” हो मग काय! कॉलेजच्या आयडिया पुन्हा वापरायला तर पाहिजे. मला थोडी शॉपिंग करावी लागेल. ” – विड

” मी आणि नेहापण ठरवतोय जायचं. ” – मी

” ए तिच्याबरोबर मी नाही येणार. हिल्स घालून येईल आणि सामान माझ्या गळ्यात देईल. ” – विड

आम्ही सगळे हसायला लागतो.

” अरे मी आधीच वॉर्निंग दिलीये तिला. ” – मी

” सगळे एकत्रच जाऊयात ना, पण त्या आधी माझ्या घरी. ” – रुजू

“फट्टूचं काय झालं? आमचं बरेच दिवस बोलणंच नाही झालंय. ” – विड

” त्याच्याशी बोलणं नाही झालंय अजून. बघू काय म्हणतोय. ” – मी


” टाईम हैं की नहीं तेरे पास? ” – मी

” अरे डार्लिंग, बोल ना! तेरे लिये तो हमेशा ही टाईम हैं. सुन २ मिनिट रुक, फोन करता वापस। ” – फट्टू

” बोल ना डार्लिंग, आज कैसे अचानक याद आ गयी।  ” – फट्टू

“तुला तर येत नाही. बिझिनेसच्या कामांमध्ये इतका काय बिझी असतोस? ” – मी

” तुमाला काय सांगू किती बिझी असतो ते. ” – फट्टू

” मेल वाचला? ” – मी

” हा पढ़ा मैंने। सॉरी अरे, मला नको जमणार यायला . शायद मिटिंग्स होंगे दो – तीन।  ” – फट्टू

” तुला काय माहित आम्ही कधी जाणार आहोत ते. फट्टू, आपली सगळी गॅंग यायला तयार आहे. सुट्टीवरून परत येऊन नव्या जोमाने कामाला लाग ना. ” – मी

” आता मी स्पर्धेत उतरलोय. त्यांच्या पुढे जायला अजून बराच वेळ लागेल. ” – फट्टू

” पुन्हा असा क्षण कधी येईल माहित नाही, जेव्हा आपण सगळे एकत्र फिरायला जाऊ. आणि आपल्याला आता संधी मिळतेय, चल ना. ” – मी

” तुमी जावा ना सगले. अगली बार पक्का आता। ” – फट्टू

” अगली बार वगैरे असं काही नसतं यार. ” – मी

“नहीं आ सकता यार सचमे। ” – फटटू

” आम्ही तुझी वाट बघतोय निघेपर्यंत. ” – मी

( to be continued…)