अनोळखी वाटा – भाग ६

डे ०२: 

आज कोणालाच उठण्याची घाई नव्हती. पळत पळत गाडी पकडायची नव्हती. ऑफिसचे प्रेसेंटेशन बनवायचे नव्हते. बॉसचा ओरडा खायचा नव्हता. सगळ्यांना आपापला वेळ हवा होता. मनाला वाटेल ते करायचं होतं. साडे दहा नंतर एकेकाची गुड मॉर्निंग होत होती.  

” ब्रेकफास्टचं काय करायचं? ” – मी  

” मी बनवू का? ” – स्वप्न्या  

” ही कला तुझ्यात आहे हे मला माहिती नव्हतं. ” – मी  

” चल चालतच जाऊ, सामान आणायला “ – स्वप्न्या 

” मी पण येतो ” – फट्टू  

” एक काम करा, स्वप्न्या तू ब्रंच बनव, ब्रेकफास्ट नको. एकदाच भरपेट होऊन जाईल ” – रुजू  

“कोणाची काही स्पेशल फर्माईश? ” – स्वप्न्या  

” पहिल्यांदा तुमचे कलागुण तर दाखवा. फर्माईश उद्या करतो. ” – विड 

स्वप्न्याला मदत करायला तर आम्ही होतोच. त्याने पास्ता, टोस्ट ब्रेड सँडविच, हाल्फ बॉईल्ड एग, सगळंच आमच्यासाठी तयार होतं.  

” तू कधी शिकला हे? ” – विड 

” आवडतं असंच मला अधेमधे बनवायला. ” – स्वप्न्या  

” घरच्यांनी लग्नासाठी मुली बघायला सुरुवात केली का? ” – रूजू  

” अरे माझं स्वप्न आहे, रिटायरमेंट नंतर मला खानावळ सुरु करायचीये. कॅफे किंवा रेस्टो नाही. खानावळ. घर का खाना. ” – स्वप्न्या  

” तुझ्यात इतकी अभिव्यक्ती असेल असं वाटलं नव्हतं. ” – मी  

” ये क्या होता है ? ” – नेहा  

” क्रिएटीव्हीटी ” – मी  

” हा ये बात तो सही है! लगा नही था रे !” – नेहा  

” आताच का नाही सुरुवात करत आहेस, थोडी थोडी? ” – रुजू  (स्वप्न्याकडे बघून ) 

” शक्यच नाही आहे. पण मला खूप मस्त वाटतंय. खूप महिन्यांनी असं काहीतरी बनवून. ” – स्वप्न्या  

” संध्याकाळ मस्त समुद्रावर घालवू. ” – विड 

“ ए सुन, तुने वो कल बॉक्सेस लाये ना, उसमेसे एक बिअर दे। ” – नेहा  

” पण तू अंघोळीला चालली आहेस ना ? ” – रुजू  

” यार मुझे बडा क्रेझ था, एक बार तो नाहते नाहते बिअर पिनी थी .” – नेहा  

” वैसे तो मुझे भी एक बार पॉटी करते करते बियर पीनी है।  ” – फट्टू  

” हाँ तो करले फिर, मैंने तो डिसाईड कर लिया है, जो चाहिए वो सब मैं करने वाली हूँ। वैसे भी घरपे जाके घरवाले शादी के पीछे पड़ेंगे।  बॉयफ्रेंड तो है नहीं और पता नहीं हसबंड ऐसे शौक पुरे करने देगा भी या नहीं। तो बस अभी करना है।  ” – नेहा 

” यार, तुम्हाला किती टेंशन असेल ना, लग्नानंतर सगळ कसं निभावून जाईल याचं. ” – विड 

” हो असतं ना, पण आई वडिलांना फक्त लग्नाची घाई. जेणेकरून त्यांना असं वाटतं की लग्नाच्या आधी आमच्या मुलीची व्हर्जिनिटी लूज नको व्हायला. ” – रुजू  

सगळे शांत.  

संध्याकाळी सगळेच वेळेत बीचवर जाण्यासाठी तयार होतात. रुजूने फ्ली मार्केट मधून घेतलेला वन पीस घातलेला असतो  आणि तिला पाहताच विडच्या मनाचे तार आपोआप वाजू लागतात. गाडीत जवळपास सगळ्यांची बसण्याची जागा ठरलेली असायची. पण आज गाडी विड चालवत होता आणि त्याचा आरसा रुजूवर येऊन थांबत होता.  

” अरे मागच्या गाड्या बघता बघता पुढच्या गाड्यांकडे पण लक्ष ठेव. ” – स्वप्न्या  

” माझं बरोबर लक्ष आहे रे. ” – विड  

आम्ही सगळे समुद्राजवळ वाळूत निवांत पडलो होतो. सगळे जण आपापला वयक्तित वेळ एन्जॉय करत होते. सहजच लक्ष गेलं तर फट्टू स्केचिंग करत होता.  

” वाह, मला वाटलं तू सोडून दिलंस. ” – मी  

“सोडूनच दिलं होतं. ” – फट्टू  

” सोडून दिलं असतंस तर स्केच बुक बॅग मध्ये टाकून आणली नसतीस. ” – मी  

” यार तू हमेशा ऐसे क्यू बात करती है? इट मेक्स मी थिंक. और मुझे नहीं सोचना है कुछ. मुझे मेरा गोल पता है. ” – फट्टू  

” अरे इतना क्यू सोच रहा, उसने सिर्फ तुझे डायलॉग फेक के मारा. ” – स्वप्न्या  

” चिल फट्टू. ” – नेहा  

नेहा बीचवर पडून स्वतःमध्येच गुंग होती. 

रुजू उठली आणि पाण्यात जाऊन फेरफटका मारत होती. थोड्यावेळाने विडसुद्धा गेला.  

” तू खूप सुंदर दिसतेयस आज. ” – विड  

” थँक यु. ” – रुजू  

दोघेही पाण्यातून चालत होते.  

” खरंच, म्हणजे हा रंग तुला खूप छान दिसतोय. ” – विड  

” थँक्स विड, आज काय इतकी माझी तारीफ करतोयस. ” – रुजू  

” सहजच आणि सॉरी, कालसाठी. ” – विड 

” काय चाललंय तुझं? सॉरी – थँक यु ? ते तर माझ्या डोक्यातून कधीच उतरून पण गेलं. ” – रुजू  

” बरं झालं ना, आपण सगळे एकत्र आलो. खूप मस्त वाटतंय. एकदम रिलॅक्सिंग. ” – विड 

” खरंच, असं वाटतंय ही वेळ संपूच नये. ” – रुजू 

सूर्यास्त होऊन अंधार पडेपर्यंत आम्ही बीचवरच होतो. नेहाने तिचा ब्लूटूथ स्पीकर आणला होता. त्यावर प्रत्येकाच्या आवडीचं गाणं, बारीबारीने वाजत होतं.  

” आज रूमवर जाता जाता पिण्यासाठी स्टॉक घेऊ. ” – विड 

” नो बिअर, ओन्ली व्हिस्की आणि व्होडका. ” – स्वप्न्या  

” यार स्वप्न्या, मतलब मेरेको लगा नहीं था! तू सबसे शरीफ बंदा था ! तू आया ही कैसे ट्रिप पे? ” – नेहा  

” यार ये क्या बात हुई? शरीफ बंदे कधीतरी दारू पीत नाहीत का? आणि बोक्याने सगळ्यात पाहिलं मलाच विचारलं होतं. मग मी येणारच ना! ” – स्वप्न्या  

” स्पेशल ट्रीटमेंट हा ! ” – नेहा  

या वाक्यावर तर स्वप्न्या खूपच भाव खात होता.  

” आज जेवण पण रूमवरच करूयात ना मग, पार्सल नेऊन. ” – रुजू  

फट्टू फार गहन विचारात होता.  

” क्या सोच रहा? ” – विड 

” आपल्याला प्लास्टिक किंवा कागदाचे ग्लासेस आणि प्लेट्स बाहेरून लेके जाने पडेंगे या हॉटेल में दे देंगे? – फट्टू  

त्याच्या या वाक्यावर सगळेच हसायला लागतात.  

“आजचीदारुपार्टी माझ्या तर्फे. माझं प्रमोशन झालंय. ” – स्वप्न्या 

“साल्या आणि तू हे आता सांग्तोयस. ” – विड 

” अरे, मी सांगणारच होतो. ” – स्वप्न्या  

” ठीक आहे मग आपण व्हिस्की ऐवजी स्कॉच घेऊ, जॅक डॅनियल आणि व्होडकामध्ये अबसोल्यूटली ऍबसॉल्यूट तर पाहिजेच. ” – विड 

” चल, तुम लोग भी क्या याद रखोगे. जे पाहिजे ते मागवा. ” – स्वप्न्या  

” सून एक काम कर, कल भी स्टॉक आजही भरके रख. ” – नेहा  

नेहा विडला सांगत होती. 

अनोळखी वाटा – भाग ४

आज सकाळी सकाळी मला रुजूकडे जायचं होतं. तिच्या घरी जाणं म्हणजे उलट उत्तर न करता आपलं म्हणणं पटवून देणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते.

(रुजूच्या घरी)

बोक्या – ऐक ना, मूड कसा आहे बाबांचा?

रुजू – ठीक आहे, पाठवतील असं वाटतंय, डोन्ट वरी, जास्त काही नाही विचारणार तुला. बरं ऐक, आपल्यासोबत मुलं येतायंत हे मी सांगितलंय आणि आपण महाराष्ट्र फिरायला जातोय. तू सांगितल्याप्रमाणे एखाद – दोन ट्रेक असतील.

(तितक्यात रुजूचे बाबा येतात.)

मी – ” नमस्ते काका ”

(ते हसतात आणि आपल्या खुर्चीवर येऊन बसतात.)

काका – ” काय कसं चाललंय तुझं? ”

मी – ” छान, हैदराबादला असते मी. आता इथे आलेय सुट्टीसाठी. ”

काका – ” आम्ही आमच्या रुजूला कधीच कधीच घरापासून दूर पाठवलं नाही. जे काय करायचं असेल ते इथेच राहून करायचं. ”

मी – ” माझ्या आई – बाबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना मी मुलगी आहे, म्हणून माझं टेन्शन कधीच नव्हतं कधी असलंच तर प्रेमापोटी.”

(ओह नो, मी हे काय बोलले. रुजूला आपल्याला न्यायचंय ट्रिपला. एका नजरेने मी तिच्याकडे पाहिलं, तिच्याही चेहऱ्यावर हेच हावभाव होते की मी हे काय बोलतेय? )

काकांनी रागाने एक कटाक्ष माझ्यावर टाकला.

काका – ” रूजू म्हणत होती, तुम्ही सगळे ट्रिपला जाणार आहात म्हणून? ”

मी – “अं हो, आम्ही प्लॅन करतोय. बरेच वर्ष झाले, सगळे एकत्र भेटले नाहीयेत. तेवढंच सगळ्यांचं भेटून होईल एकत्र. ”

काका – ” पुण्यातही भेटताच की तुम्ही? ”

मी – ” हो… पण सगळ्यांचं एकत्र भेटणं नाही होत ना! आणि तितका वेळही एकमेकांसोबत मिळत नाही. म्हणून विचार केला सोबत ट्रिपला जाऊ.”

काका – ” बरं मग कोण कोण आहेत तुमच्या सोबत? ”

मी – ” आम्ही कॉलेजचेच सगळे. विड, फट्टू, नेहा स्वप्न्या. ”

काका – ” विड?? हे कसलं नाव? ”

(रुजू मनात – बोक्या गप्प बस)

मी – ” नाही काका… ते असंच… पेट नेम. ”

(रुजूकडे पाहत, मी – सॉरी)

काका – “अस्सं… कुठे जाणार आहात तुम्ही? ”

मी – ” आम्ही महाराष्ट्रातच जायचा विचार करतोय. पुण्याच्या आसपासच. ”

काका – ” तुम्ही मुली आहात, आपल्या मर्यादा लक्षात ठेवा. आम्ही रुजूला नेहमी सांगत असतो, कोणालाही कोणत्याही कारणाने आपल्याला हात लावू द्यायचा नाही… मुलं काय मस्करीमध्येही, टाळी मारण्याचा उद्देशाने…

(काकांचं प्रवचन पुन्हा सुरु. हे प्रवचन सुरु झालं की रुजूलाच जास्त खजील झाल्यासारखं वाटायचं.)

मी – ” काका मी आहे तिच्यासोबत. तुम्ही काळजी नका करू. ”

काका – ” तुझाही नंबर मला देऊन ठेव. मी रोज फोन करेन.

मी – ” हो नक्कीच. ”

(आता यांच्यासमोर बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.)

“ओके काका, निघते मग मी. ”

काका – ” बरं चालेल. रुजूला सोडायला येईनच मी, तेव्हा भेटू. ”

(घरातून आम्ही दोघीही बाहेर पडलो.)

मी – ” अजून हे टॉर्चर असतं का घरी? ”

रुजू – ” मग काय यार, वैताग आहे नुसता. ”

मी – ” चल सोड, जाऊ दे. आपण जातोय हे काही कमी आहे का? फुल्ल धमाल करू. ”

रुजू – ” ए बोक्या, तुम्ही शॉपिंगला जाणार आहात ना! मी पण येईन. ”

मी – ” या रविवारीच जातोय. तयार राहा. मी फोन करेन. साधारण पुढच्या गुरुवारी आपण निघू, २ जूनला. ”

रुजू – ” आता एक आठवडा निघणं खरंच कठीण आहे. ”

मी – ” हो, मी पण वाट बघतेय. मी निघतेय आता. ”

……………………………………………………………………………………………………………………………………………………..

“फट्टू, मी बोलतेय. प्लिज चल ना, आता तर खरंच सगळेच तयार झालेयत ट्रिपला यायला. मला माहित नाही तुझी कोणाशी रेस सुरु आहे ज्यासाठी तू एक मिनिटही दवडत नाहीयेस पण खरंच एकदा ऐक आणि चल. काय माहित कदाचित तुलाच तुझं काहीतरी सापडेल. तुझ्यासाठी असलेलं. ” – मी

( एकाच ओघात मी इतकं सगळं बोलून गेले आणि पुढची दोन मिनिट शांतता )

” हो गया तेरा? साँस लेती हैं भी या नही? ” – फट्टू

” मी जे बोलतेय त्याकडे लक्ष दे ना! ” – मी

” अच्छा चल बता, नेहा भी आ रही क्या? और उसके हिल्स का क्या करेगी? ” – फट्टू

” तिला तर पहिल्यांदाच स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलीये, फक्त शूज घ्यायचेयत. ” – मी

” अच्छा है, उसको समझा नहीं तो पागल आएगी ऐसेही मुँह उठाके। चल थोड़ी देर बाद बात करता तुझसे। ” – फट्टू

फट्टू येण्याबद्दल सोडून बाकी सगळं बोलला. कसं समजाऊ याला येण्याबद्दल? चित्र तर हेच होतं की तो येणार नाही, पण तरीही मनातून कुठेतरी हेच वाटत होतं की शेवटच्या क्षणी तरी तो येईल. चला आपली जायची तयारी तर करावीच लागेल.

……………………………………………………………………………………………………………………………………………………..

इतके दिवस फोनवर बोलणं चाललेले आम्ही सगळे एकदा एकत्र भेटलोच. विडला काहीच घ्यायचे नव्हतं, पण त्याला पळवण्याबद्दल आम्हाला प्लँनिंग करायचं होतं. शिवाय ट्रिपला निघण्याची तारीखही सगळ्यांना सांगायची होती.

” बोक्या, कौनसे शूज लू मैं? ” – नेहा

” देखते है कुछ सस्ता सूंदर टिकाऊ। ” – मी

सगळ्यांची सगळी थोड्या – जास्त प्रमाणातली शॉपिंग झाली आणि आम्ही कॅफे कॉफी डे मध्ये बसून बाकी गोष्टी बोलायचं ठरवलं. आता आम्हाला हे परवडण्यासारखं होतं कारण सगळेच कमावते होते. कॉलेजमध्ये असताना यायच्या आधीही ४ -५ वेळा विचार केला जायचा, खिशाला परवडेल की नाही याचा. क्वचितच कधी आलो असेल आम्ही. आज बऱ्याच गप्पा रंगणार होत्या आणि बरंच प्लॅनिंगही होणार होतं.

” स्वप्न्या तू गाडीची सोय करू शकतोस का? ” – मी

” आता गाडी पण माझीच का? मी येतोय ते बास नाहीये का? ” – स्वप्न्या

” किती रडका आहे हा यार… ” – मी

” ए मेरे घर की गाडी पार्किंगसे चुरा के लेके जाए क्या? ” – नेहा

” तुझे पप्पा ना मिलिटरी मध्ये आहेत. आपण मोकळ्या हवेत नाही, हवालात जाऊ. ” – विड

आणि विड स्वतःच हसायला लागला. त्याच्या हसण्याची एक पद्धत होती, हे हे हे ने सुरुवात करून तोच जोरात हसायला लागायचा. कोणाला जोक आवडला नाही ना, तरी त्याचं हसणं बघून सगळ्यांना हसायला यायचं.

” माझे बाबा गाडी द्यायचा प्रश्नच येत नाही. ” – रुजू

” मी तर स्वतःच घरातून पळतोय, गाडी पण पळवली तर मग झालंच. हे हे हे हाहाहाहा… ” – विड

” माझे बाबा आता इथे नाहीयेत, नाहीतर माझीच गाडी घेतली असती ” – मी

” स्वप्न्या प्लिज घे ना गाडी, उगीच गाडीला एक्सट्रा पैसे जातील आपले. ” – रुजू

” अरे यार, तुम्ही मला खरंच मरवणार आहात. एकतर घरच्यांना नक्की कुठे जाणार, कुठे राहणार हे सांगणार नाही. बाप म्हणेल, याच्यापुढे मला तोंड दाखवू नको, नाहीतर मला तुम्हाला म्हणावं लागेल, तोंड दाखवू नका परत. ” – स्वप्न्या

” ठीक आहे, तू समोर आलास की मग तुला पार्श्वभाग दाखवतो. हे हे हे हाहाहाहा. ” – विड

आता तर सगळेच हसायला लागतात.

” ग्रेट गाडीचं तर झालं. बोक्या, फट्टू खरंच येत नाहीये? ” – रुजू

” अरे उसको क्या हुआ? क्यों नहीं आ रहा वो गधा? ” – नेहा

” मी खूप प्रयत्न केला. पण काहीच बोलला नाही. ” – मी

” मी सुद्धा फोन केलेला त्याला पण येण्याबद्दल काहीच नाही बोलला. ” – विड

 

अनोळखी वाटा – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

अनोळखी वाटा – #2

“ऑफिसमध्ये सगळं काही ठीक आहे ना?” – आई

” हो. का? ” – मी

” नाही, सहजंच. काही झालंय का ऑफिसमध्ये? म्हणून जॉब सोडलास का? ” – आई

” नाही गं. उलट सर थांबण्यासाठी सॅलरी वाढवण्याबद्दल पण विचारत होते. ” – मी

” मग बाकी काही? रूममेट्स बरोबर काही खटका उडालाय का? असं काही असेल तर तू एकटी फ्लॅट घेऊन राहिलीस तरी चालेल. ” – आई

” तुला आनंद नाही झालाय का, मी आलेय तर? ” – मी

” मी मूळ कारण विचारतेय. ” – आई ( जरा रागाऊनच बोलली )

” माझा मूळ स्वभाव माहित नाहीये का तुला? आणि रूममेट्स बरोबर भांडण व्हायला भक्ती, अश्विनीला ओळखत नाहीस का तू? माझ्यापेक्षा तुझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे ना. त्यांना खूप वाईट वाटलं माहितेय, मी त्यांना सोडून इथे आले. त्यामुळे असा विचार कधीच करू नकोस की आमच्यात काही वादावादी झालेयत. ” – मी

” मग काही मानसिक दडपण? ” – आई

” हे देवा ” – डोक्याला हात लावत मी आईकडे बघत होते.

गंमतीतच तिला म्हटलं,

” तू माझं लग्न करून देत नाहीयेस यापेक्षा आणखी कोणतं मानसिक दडपण असणार. आता तर सहाएक महिन्यांतून एखादा पांढरा केसही सापडतो. कोणाला सांगू माझं हे दुखं? ”

उत्तराच्या अपेक्षेत जशा सगळ्या  आया तीव्र कटाक्ष टाकतात, तसाच तिनेही टाकला,

” बरं ऐक, मला एकसुरीपणाचा कंटाळा येतो. चाळीस वर्ष एकाच ठिकाणी राहून एकच काम करण्यात, एकच पदार्थ खाण्यात, त्याच त्याच रस्त्यांवर चालण्यात मला काही विशेष आवड नाहीये . उद्या चाळीस वर्ष उलटल्यानंतर मला असं नाही म्हणायचंय, अरे चाळीस वर्ष कुठे सरली कळलंच नाही. ” – मी

” हे सगळे नखरे लग्न होईपर्यंत. नंतर सगळे बरोबर गुंतून जातात. ” – आई

” अजिबात नाही. माझ्यासारखाच एखादा वेडा भेटला तरंच लग्न करेन, नाहीतर मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. ” – मी

माझं हे भाषण आईला कितपत कळलं, समजलं, पटलं आणि झेपलं होतं माहित नाही. कारण त्यानंतर ती फक्त एकंच वाक्य म्हणाली,

” चल चहा बनवते तुझ्यासाठी. ”


ई-मेल करून तीन – चार दिवस झाले होते. अजून कोणाचं काहीच उत्तर आलं नव्हतं. ” वाचला असेल ना मेल त्यांनी? ” मी स्वतःलाच विचारात होते. त्यांना फोन करून मीच सांगू का, तुम्हाला ई-मेल केलाय तो वाचा म्हणून. कसं वाटेल ते? स्वप्न्याला फोन केला तर तो फ्रुस्ट्रेटेड इन्सान सगळ्यात पाहिलं म्हणेल, ” तुला काही कामं नाहीयेत. तुला काय तिथे बसून मेल लिहायला. ” आणि अशा पद्धतीने म्हणेल जसं की आम्हाला फुकटचं खिरापत वाटतात तसा पगार देतात.

तेवढयात फोन वाजयला लागला.

” शंभर वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुलाच फोन करणार होते. ” – मी

” ते सगळं ठीक आहे पण काय गं, ई-मेल लिहायच्या आधी दोन बाटल्या घेऊन बसलेलीस का? ” – स्वप्न्या

” केलास फोन केल्या केल्या अपमान. नशीब मी स्वतःहून फोन नाही केला. ” – मी

” अपमान?? तरी नशीब दोनच बाटल्या म्हणालो. चल सांग हा आता पटकन. ” – स्वप्न्या

” तुला काही गांभीर्य आहे का नाही? ई-मेल मध्ये लिहिलेला टॉपिक सिरीयस आहे आणि मी त्याबद्दल. ” – मी

” तू पुण्यात परत आलीस? ” – स्वप्न्या

” हो. त्यात काय इतकं? ” – मी

” येडीएस का तू? फिरायला जायला जॉब सोडून यायची काय गरज होती? ” – स्वप्न्या

” तू येडा आहेस. मी काय कायमचं पुण्यात नाही आलेय. तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम काय आहे, मी पुण्यात आलेय तर? जा तू तुझ्या कंपनीत कारकुनीच कर. बधीर झालयस त्याच्याने. मी काय बोलतेय कळतंच नाहीये तुला. ” – मी

” बास का! इतका पण अपमान केला नव्हता मी तुझा. ” – स्वप्न्या

” बरं, चल मग आता, तू येतोयस हे नक्की आहे ना! ” – मी

“ए थांब बाई. घरी फादरला पटवावं लागेल आधी. कोण कोण येणारे? आपण दोघंच जायचंय का? बोअर होईल अरे. अजून बाकी कोणाचा फोन आला का नाही? ” – स्वप्न्या

” किती रडतोस यार. बाकीच्यांना तयार करते मी. तू तुझ्या फादरला तयार कर आणि कोणाचाही फोन आला तर सांगायचं तू येतोयस माझ्यासोबत. ” – मी

” घरी काय सांगू, कुठे जातोय? इतके दिवस ट्रेकिंगला कोणीही सोडणार नाही. ” – स्वप्न्या

” बरं सांग मग महाराष्ट्र फिरायला जातोय. ” – मी

” अरे यार, तू मला मारवणार आहेस. ” – स्वप्न्या

” तसंही फार चांगलं जगत नाहीयेस. ठेव आता आणि जा, तुला तर दोघा दोघांची परवानगी घ्यायचीये. बाय. ” – मी

” चल बाय. ” – स्वप्न्या


” बोक्या काय, हे खरं आहे का? ” – रुजू

” काय? ” – मी

” हेच,ट्रिपचं? ” – रुजू

” हो मग काय, स्वप्न्या पण येतोय. चल ना, खूप वर्षांनी सगळे एकत्र असू. ” – मी

” बोक्या वेडी आहेस का तू? प्लॅनिंग काय, जायचं कुठे? राहायचं कुठे? आणि घरी काय सांगू कुठे जातोय? ” – रुजू

” ऐक, स्वप्न्याच्या घरी सांगणारे महाराष्ट्र फिरायला जातोय. तू पण तेच सांग. एखाद दोन ट्रेकिंग असतील. राहायची सोय हॉटेल्स मध्ये असेल. ” – मी

” माहितेय ना, घरी यावं लागेल तुला. ” – रुजू

” कधी येऊ बोल? मी पुण्यातच आहे. ” – मी

” कधी आलीस? बरं मी घरी आधी वातावरण निर्मिती करते, मग तुला सांगते यायला. ” – रुजू

” चालेल. स्वप्न्याला पण घेऊन येऊ का? ” – मी

” बोक्या, प्लॅन कॅन्सल करायचंय का? एकतर मुलं आहेत हेच त्यांना नीट समजावून सांगावं लागणारे. ” – रुजू

” हम्म्म्म, घरचे अजुनपण एकाच गोष्टीवर प्रवचन देतात का? ” – मी

” मी घरी थांबतंच नाही. आजकाल तर मुलं बघायचं नवीन फॅड डोक्यात घेतलंय. बरंय आपण जातोय, माझ्या डोक्याला शांती. ” – रुजू

” ऐक ना, विड शी बोलशील? ” – मी

” कॉन्फरेन्स करूयात रात्री. मी तुम्हाला दोघांना घेते कॉन्फरन्स मध्ये, मग बोलू. फट्टू आणि नेहाचं काय? ” – रुजू

” त्यांना कसं पटवायचं हे मला खूप चांगलं माहितेय. नेहाला तर इतकंच सांगायचं सगळे तयार आहेत ट्रीपला, आम्ही निघतोय. दुसऱ्याच दिवशी बॅग घेऊन माझ्या घरी येईल ती. ” – मी

” बरं चल, मला सांग त्या दोघांचं कसं होतंय. रात्री बोलू, मला आता लेक्चर घ्यायला जायचंय. ” – रुजू

” नक्कीच. बोलू रात्री. बाय ” – मी

” बाय. ” – रुजू


” हेलो ” – मी

” अरे बोक्या, कैसी हैं? ” – नेहा

” मैं ठीक हूँ. तू बता? ” – मी

” तेरा मेल पढ़ा. सचमे ऐसा कुछ प्लान कर रही है क्या? ” – नेहा

” हाँ यार, इसीलिये तो तुझे कॉल किया। सब लोग रेडी हैं आने के लिए. तू आ रही हैं ना? ” मी

“ये भी कोई पूछने वाली बात हैं? ऑफकोर्स। कहा कहा जाना हैं? वैसे मैं शॉपिंग कर लू.” – नेहा

” देख, कुछ भी नहीं लिया तूने तो भी चलेगा बस एक बॅकपॅक और एक अच्छे शूज लेना। ” – मी

” अरे देख़ मैं क्या क्या लेके आती. हाये, शॉपिंग जाना हैं. ” – नेहा

” मेरी माँ, तेरी बॅग तुझेही पकड़नी हैं. तो अपनी साईज़ और हाइट के हिसाब से लेना, जो भी ले रही. ” – मी

” ए सुन ना, तू आएगी क्या? मुझे मदद हो जाएगी और तुझे कुछ लेना होगा तो तेरा भी हो जाएगा। ” – नेहा

” उम्म्म… चालेल. येते मी. रविवारी जाऊया. ” – मी

” संडे को ना? ” – नेहा

” हा रे, संडे को ही. ” – मी


आता फक्त विड आणि फट्टू बाकी आहेत. या दोघांना कसं समजवायचं? यांचं तर नेहा सारखं पण नाही आहे, सगळे हो म्हटले कि लगेच सुटायचं. विडच्या घरचे… आणि फट्टू कोणाशी स्पर्धा करतोय काय माहिती? या दोघांचाही नकार आला तर बाकीचेही डळमळीत होतील. विडशी रुजूबरोबर बोलता येईल. फट्टूशी आपणच बोलूयात. तसं फट्टूला समजावणं सोपं आहे आणि विडला घरातून पळवणं.

रुजूला फोन केला, विडशी बोलण्याची ही योग्य वेळ आहे.

” हॅलो ” – रुजू

” हॅलो, होल्ड कर, विडला कॉन्फरेन्समध्ये घेते. ” – मी

” हॅलो ” – विड

” हॅलो, कसा आहेस? ” – मी

” यार, वर्कशॉप वर आहे. कसा असणार? पळून जावसं वाटतंय इथून. ” – विड

“मग मी पळवते तुला, पण त्याआधी रुजू दुसऱ्या लाईनवर आहे, तिलापण कनेक्ट करते. ” – मी

” हॅलो, बोक्या s s … ” – रुजू

” हा रुजू बोल, विडपण लाईनवर आहे. ” – मी

” विड, कसा आहेस? ” – रुजू

” वर्कशॉप वर आहे. ” – विड

” ओ ओ … समजलं कसा आहेस ते. ” – रुजू

“विड, मेल वाचलास? ” – मी

” हो, पण काही फायदा नाहीये. माझ्यात घरी विचारण्याची हिम्मत नाहीये आणि मला माहितेय, मी विचारलं, ते नाही म्हणाले तर माझ्यावर नजर ठेऊन राहतील, मी कुठे जातो, कुठे नाही यावर” – विड

” एकदा समजावून तर बघ. तू काय आता लहान आहेस का? कॉलेजपर्यंत ठीक होतं. आता काय अरे? काय बरोबर, काय चुकीचं इतकं कळण्याइतपत आपण नक्कीच मोठे झालो आहोत. ” – रुजू

” स्वप्न्या, रुजू, नेहा, मी नक्की आहोत. ” – मी

” बोक्या ??…. ” – रुजू

” अरे रुजू, फक्त  तुझ्या घरी जाऊन सांगायचंय, जायचं तर नक्की आहेच ना !! ” – मी

” विड तुझ्याकडे दोनच पर्याय आहेत. घरी सांग नाहीतर घरी सांगू नकोस. ” – मी

” तसं असेल तर मी घरी सांगणारंच नाही. ” – विड

” म्हणजे तू येतोयस ? ” – रुजू

” तुम्ही सगळे जाताय म्हटल्यावर प्रश्न आहे का  हा! पण जायचंय कुठे? ” – विड

” ते आपण जायच्या आधी एकदा ठरवू भेटून. ” – मी

” विड पण घरी निदान लेटर लिहून ठेव जेणेकरून त्यांना असं नाही वाटणार की तुला कोणीतरी उचलून घेऊन गेलंय. ” – रुजू

” हो मग काय! कॉलेजच्या आयडिया पुन्हा वापरायला तर पाहिजे. मला थोडी शॉपिंग करावी लागेल. ” – विड

” मी आणि नेहापण ठरवतोय जायचं. ” – मी

” ए तिच्याबरोबर मी नाही येणार. हिल्स घालून येईल आणि सामान माझ्या गळ्यात देईल. ” – विड

आम्ही सगळे हसायला लागतो.

” अरे मी आधीच वॉर्निंग दिलीये तिला. ” – मी

” सगळे एकत्रच जाऊयात ना, पण त्या आधी माझ्या घरी. ” – रुजू

“फट्टूचं काय झालं? आमचं बरेच दिवस बोलणंच नाही झालंय. ” – विड

” त्याच्याशी बोलणं नाही झालंय अजून. बघू काय म्हणतोय. ” – मी


” टाईम हैं की नहीं तेरे पास? ” – मी

” अरे डार्लिंग, बोल ना! तेरे लिये तो हमेशा ही टाईम हैं. सुन २ मिनिट रुक, फोन करता वापस। ” – फट्टू

” बोल ना डार्लिंग, आज कैसे अचानक याद आ गयी।  ” – फट्टू

“तुला तर येत नाही. बिझिनेसच्या कामांमध्ये इतका काय बिझी असतोस? ” – मी

” तुमाला काय सांगू किती बिझी असतो ते. ” – फट्टू

” मेल वाचला? ” – मी

” हा पढ़ा मैंने। सॉरी अरे, मला नको जमणार यायला . शायद मिटिंग्स होंगे दो – तीन।  ” – फट्टू

” तुला काय माहित आम्ही कधी जाणार आहोत ते. फट्टू, आपली सगळी गॅंग यायला तयार आहे. सुट्टीवरून परत येऊन नव्या जोमाने कामाला लाग ना. ” – मी

” आता मी स्पर्धेत उतरलोय. त्यांच्या पुढे जायला अजून बराच वेळ लागेल. ” – फट्टू

” पुन्हा असा क्षण कधी येईल माहित नाही, जेव्हा आपण सगळे एकत्र फिरायला जाऊ. आणि आपल्याला आता संधी मिळतेय, चल ना. ” – मी

” तुमी जावा ना सगले. अगली बार पक्का आता। ” – फट्टू

” अगली बार वगैरे असं काही नसतं यार. ” – मी

“नहीं आ सकता यार सचमे। ” – फटटू

” आम्ही तुझी वाट बघतोय निघेपर्यंत. ” – मी

( to be continued…)

अनोळखी वाटा – #1

 

सुट्टीचा पहिलाच दिवस, दुपारी साडे अकरा, बाराची वेळ. कॉफीचा घोट घेत घेत शांत बसले होते तेवढ्यात फोन खणाणला. माँ का फोन आया, माँ का फोन आया…  तेरी माँ का…

रिंगटोन वाजताच कळलं होतं, माझ्या माँ साहेबांचा फोन आहे ते.

” हा, बोल गं. ” – मी

“काय, ऑफिस मध्ये आहेस का? ” – आई

“नाही अगं, घरीच आहे. बोलना” – मी

“आज कशाबद्दल सुट्टी? घरी यायचं म्हटलं का तुला सुट्ट्या मिळत नाहीत.” – आई

“हो गं, आता घरीच येतेय चार – पाच दिवसांसाठी. मी…. जॉब सोडला” – मी

“अचानक? का? सगळं तर ठीक होतं ना?” – आई

“आई…., मृत्युंजयमध्ये शिवाजी सावंत यांनी काय लिहिलंय माहितेय? {अचानक असं काही नसतं, आपल्याला मागचा पुढचा संदर्भ माहित नसतो म्हणून ते अचानक भासतं.}” – मी

“बरं मग मला माहित नसलेला हा मागचा आणि पुढचा संदर्भ सांगशील का?” – आई

“हम्म्म्मम…. सांगते. अगं माझं हैदराबाद सगळं बघून झालं. पॅराडाईज ची बिर्याणी कितीतरी वेळा खाऊन झाली. मग नवीन आता करण्यासारखं हैदराबादमध्ये राहिलं नव्हतं. मला काहीतरी वेगळं हवंय. ज्याने मला प्रत्येक क्षणी उत्साह, इन्स्पायर्ड वाटेल.” – मी

“मग ते वेगळं नक्की काय आहे? आता कोणत्या दुसऱ्या शहरात जायचा विचार आहे?” – आई

“तीच तर गंमत आहे ना ! तेच शोधायचंय मला.” – मी

“कुठे शोधणारेस हे तू? आणि या कंपनीचं दुसऱ्या शहरात ऑफिस नाहीये का? ” – आई

“माहित नाही, पण थोडे दिवस मी शहरापासून दूर डोंगरांच्या कुशीत लपून बसण्याचा विचार करतेय. तुलाही फोन करणार नाहीये मी. शिवाय सरांशी बोलणं झालंय माझं. दोन – तीन शहरांमध्ये आहेत कंपनीच्या ब्रॅंचेस, तर ते कळवतील मला. काळजी नको करुस. ” – मी

“बरंय बाबा, तुमच्या जेनरेशनचं. आमच्या वेळी आम्हाला असं काही नाही सुचायचं आणि सुचलं तरी कोणी ऐकून घ्यायचं नाही. एकदा नोकरी लागली की रिटायरमेंटपर्यंत विषयच नको. आधीच सांगतेय, एकटं जायचं नाहीये, कोणीतरी सोबत हवं. दोन-तीन मित्र-मैत्रिणी.” – आई

“आई गं… आता त्यांना मी कुठे शोधू? आणि मला जे स्वतःच्या आयुष्याबद्दल वाटतंय तेच त्यांना वाटत असेल कशावरून?” – मी

“हे बघ त्यांना सांग फिरायला जाऊया आणि तुला तुझी काय उत्तरं शोधायचीयेत ती शोध. पण कोणालातरी सोबत घेऊन जायचं.” – आई

“बरं, शोधते आता कोणालातरी. चल नंतर बोलू, माझी कॉफी थंड झाली. बाय.” – मी

“बाय बेटा.” – आई


       आपण एककाम करूया शहराच्या आसपास राहूनच शहरापासूनलोकांपासून अलिप्त राहूयागावातल्या लोकांचंही असतं की असंचशहराच्या झगमगाटीबिझी आयुष्यापासून अलिप्तच असतात ना तेठरलं तर मग ! जाऊ ना पुन्हा आपल्या गड किल्ल्यांवरकिल्ल्याच्या माथ्यावरून खालून जाणारा रस्ता पाहू आणि डोंगरावरून पायवाट शोधततुडवत दुसऱ्या डोंगरावरची वाट शोधूकाय माहितकदाचित मला मीच भेटून जाईल या प्रवासात. जेव्हा मला मी भेटेन या प्रवासाततेव्हा तिच्याशी खूप गप्पा मारणारे मीम्हणणार आहे… “अगं वेडेकुठे हरवली होतीस तूकदाचित तुला शोधायचा प्रयत्न मी इतक्या उशिरा केलाम्हणून रागवलीयेस का माझ्यावरऑफिसचे सहकारीसोबतीमित्र – मैत्रिणी तसे होतेच. पार्टीशॉर्ट ट्रिप्स सगळं व्हायचं पण तू नव्हतीस. तू हरवलीस आणि मला अचानक वाटलं, ‘अरे आता मी खूप मोठी झालीयेआधीची हुल्लडबाजी इन्स्पायर्ड राहण्यासाठीआपण जगतोय असं वाटण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून पाहणे या सगळ्या गोष्टी मला बालिश वाटायला लागल्या. आणि मी घाबरायला लागलेरिस्क घेऊया असं क्वचितच मनात आलं असेल इतक्या दिवसांतकिंवा वर्षांत. पण आता तू भेटलीयेस ना! दोघी मिळून कल्ला करूया. आता मी तुला कधीच नाही सोडणार. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची कोवळी किरणं जशी डोळ्यांवर अली तसे डोळे किलबिलायला लागले. तोपर्यंत पक्षी किलबिलून आपल्या कामालाही लागले होते.

“अरे यार, मी रात्री असंच डायरी लिहिता लिहिता झोपले वाटतं.”

स्वतःशी बडबडतच होते तेवढ्यात दारावरची टकटक ऐकू आली.

“उठो दीदी, साढ़े नौ बज गए। ” आमच्या मावशी किलबिलायल्या लागल्या होत्या. मावशी येऊन आपल्या कामाला लागल्या आणि मी आपल्या.

माझ्याबरोबर यायला आता शोधू कोणालाकॉलेजसारखंही आता राहिलं नाही. तिथे बंक मारायला कॉलेज तरी होतंइथे सगळ्यांना दहा-पंधरा दिवस सुट्टी घेऊनच यावं लागेल. पण सांगू काय त्यांनाट्रिपला जायचंयआणि कोणीच नाही आलं तरमनाचं संभाषण त्याच्याशीच चालू होतं पण मीच त्याला थांबवलं. माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मला द्यायचं होतं.  मग कोणाच्या येण्या-न येण्यावरून माझा विचार डळमळतीत का व्हावा? ट्रिपचा बहाणा नकोजे जसं आहे तेच त्यांना सांगतेहा! पण ट्रिपचा पर्याय तर ठेवूच शकते ना! सगळ्यांना मिळून एकत्रच इ-मेल करतेम्हणजे सगळ्यांचा अभिप्रायही एकदाच काय तो समजेलऋजूफट्टूविडस्वप्न्याआणि नेहा सगळ्यांना एकत्रच ई-मेल करायच्या उद्देशाने टायपिंग सुरु केलं.


डिअर मित्र-मैत्रिणींनो,

“कसे आहात? नक्कीच आपापल्या कामांमध्ये खूप व्यस्त असाल. कॉलेजला लेक्चर्स बंक करून भेटणं तरी व्हायचं. कुठेही कट्टा टाकून बसलेलो असायचो पण ऑफीसमध्ये कोणी बंक हा पर्यायच ठेवला नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, हा ई-मेल मी सहजच म्हणून केलाय. त्यामुळे जर या उद्देशाने वाचत असाल तर आताच बंद करा वाचणं आणि सगळी कामं आटपून या. पण यात महत्वाचं मात्र नक्की काहीतरी आहे. त्यामुळे दहा दिवसांनी मेसेज करून असं नका सांगू, सॉरी बोक्या तुझा ई-मेल वाचायला वेळच नव्हता.

दोन दिवसांपूर्वी माझी जुनी डायरीमला सापडलीउत्सुकतेने उघडून बघितली तर त्यात तुम्हीच होता. स्वप्न्याचे न उगवणारे केसतर विडच्या गाडीची अक्रोड झालेली टाकीनेहाचे हाय हिल्सतर रुजूच्या बाबांची रुजू चालवत असलेली एकोणीसशे सत्तरची गाडीमाझं आणि फट्टूचं स्वप्न. जग फिरताना अचानक एखाद्या शहरांत एकमेकांना भेटायचंफट्टू आपण आपल्याच शहरात एकमेकांना भेटत नाहीयेउद्या असं नको व्हायलात्या वेगळ्या शहरांत आपण भेटूनही एकमेकांना काय कसा आहेस आणि सध्या काय चाललंयया पलीकडे काय बोलावं हे सुचणारच नाही. 

तुमच्यासाठी एक न्यूज आहेमी पुण्यात परत येतेय. हैदराबादने ही मला आपलंस केलं मग आता तिथे करण्यासारखं फारसं काही नव्हतं. आपण जेव्हा एकत्र होतोआपल्या स्वप्नांबद्दल बोलायचो तेव्हा आपल्याला आपल्या क्षेत्रात अव्वल राहायचं होतंतीच तीच गोष्ट करायची होती पण नावीन्यानेएक नवीन दृष्टिकोन ठेऊन. मला माहितेय रोजच्या आयुष्याने त्या सगळ्या गोष्टी कदाचित कधीच बोथट होऊन गेल्या असतील. पण आता त्या गोष्टीच महत्व मला निकटतेने जाणवतंय आणि म्हणूनच हरवलेल्या स्वतःचा शोध घेण्यासाठी मी दहा पंधरा दिवसांसाठी शहरापासून थोडं दूर शांततेतशांततेचा प्रवास करण्यासाठी जाणार आहे. तिथेच जिथे आपल्या काही आठवणी आजही रमून राहिलेल्या आहेत. म्हणूनच तुम्हालाही ईमेल करून हे कळवतेय कारण तिथे कधीच मी नव्हतेनेहमी आपण होतो. कदाचित माझं हे बोलणं तुम्हाला आता मूर्खपणाचंही वाटेलस्वप्न्या तर म्हणेलबोक्याला काही काम नाहीये वाटतं म्हणून हेनवीन फॅड डोक्यात आणलंयकाहीही समजापण मी खरंच जातेय आणि हा ईमेल तितक्याच मनापासून मी तुम्हाला लिहिलाय. काहीच नाही तर ट्रिप म्हणून तरी या गोष्टीचा नक्की विचार करू शकतामी तर जातेय आणि तुमची वाट बघतेय.” 


दोन दिवस इथे आराम करून माझ्या घरी जायला निघालेमाझ्या प्रवासाची सुरुवातही इथूनच होणार होती आणि कदाचित या सगळ्यांच्या ट्रिपचीहीहैदराबाद ते पुणे तसंही काही फारसा प्रवास नाहीये. अ नाईट जर्नी. ऑफिस सोडल्यानंतर सीऑफ पार्टी वगैरे तेव्हाच झाल्या होत्यात्यामुळे हैदराबादमध्ये मागे असं काहीच राहिलं नव्हतं.  ट्रेन रात्री आठची होती त्यामुळे सकाळपासून माझी आवरा-आवरीच सुरु होतीफ्लॅट बघायला ब्रोकरसोबत काही माणसं अधून-मधून येतंच होतीबरंचसं सामान मी तिथेच ठेऊन देणार होतेदिवसभरात कोणाचाही फोन किंवा मेसेज आला नव्हतामनाचा एक कोपरा त्याची वाट पाहातच होतास्टेशनवर जरा लवकरच येऊन ट्रेनची वाट पाहत बसले होतेसोबत द्यायला तसेही पुस्तक होतंचआतापर्यंत एक गोष्ट मला कळली होती ती म्हणजेया जगात पुस्तकं आणि माणसं असंख्य आहेत त्यामुळे जेवढी शक्य होतील तेवढी जोडत चलाजेव्हा माणसं जवळपास नसतात तेव्हा पुस्तकं गप्पा मारतातनवीन गोष्टी सांगतातशिकवतातहैदराबाद सोडून चालले होते तर इथे आल्यापासुनच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणींची चित्र एकामागोमाग डोळ्यांसमोर येत होती 


जेव्हा आपण एखाद्या नव्या ठिकाणी जातोकामासाठी म्हणा किंवा फिरायला तेव्हा आपल्या मनावर भुरळ पाडणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वातावरण. त्या परिसरातली हवा – दमटथंड, उष्ण, मोकळं आकाश, मळभ आलेलं वातावरण. त्या शहराचा आपल्या मनावर प्रभाव पाडण्यात काही अंशी या वातावरणाचाही हात असतोचहैदराबादमध्ये मी जेव्हा पाहिलं पाऊल ठेवलं तेव्हा माझा आवडता पावसाळा ऋतू सुरु होता. मला नेहमी आवडणारं मळभ आलेलं वातावरण मी सुरुवातीलाच अनुभवणार होते. हैदराबादमध्ये ओळखीचं असं कुणीच नव्हतंत्यामुळे सुरुवातीचे काही दिवस हॉटेलमध्ये राहणं भागच होतं. ऑफिस सुरु व्हायलाही तीन-चार दिवस होते. तोपर्यंत मी हैदराबाद धुंडाळून काढायचं ठरवलंम्हणजे शहराशी माझी लवकरच ओळख होईलशिवाय जिथे पुढचे काही महिने किंवा वर्ष राहायचंय त्या शहराशी मैत्री तर झाली पाहिजेच ना. 

माझं हॉटेल आमिरपेटमध्ये होतं, शहराशी फारशी ओळख नसल्यामुळे मी स्वतःसाठी टू व्हीलर रेंट घेतली. गूगल मॅपच्या भरवशाने पहिल्याच दिवशी निघाले चार मिनार बघायला. हैदराबादमध्ये अमीरपेट जवळच्या रस्त्यांची अवस्था फारंच वाईट होती. प्रत्येक २मीटर वर खड्डे. वायर्स आणि पोलमध्ये गुरफ़टलेलं शहर. निदान मी ज्या एरिआत राहत होते त्याबद्दल तरी हेच म्हणू शकत होते. पण तिथूनच पुढे गेल्यावर बंजारा हिल्स आणि ज्युबली हिल्स चा एरिआ मस्त होता. तसंच पुढे सिकंदराबाद. प्रशस्त रस्ते, आणि नव्यानेच वसणारं हे शहर मन प्रसन्न करतं. चार मिनारला पोहोचले आणि बघते तर काय, आजूबाजूला सगळीकडे स्टॉल्स आणि शॉप्स.  रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं आणि मध्ये भक्कमपणे उभा चार मिनार. मी गेले तेव्हा चार मिनाराच्या डागडुजीकरणाचं काम सुरु होतं. मुहम्मद कुतुबशहाने वसवलेल्या या शहराचं चार मिनार हे प्रतीक. तुम्हाला माहितेय भाग्यनगरीचं नाव हैदराबाद कधीपासून पडलं? कुतुबशाहाला एका हिंदू मुलीशी प्रेम झाले, जिचं नाव होतं भागमती. कुतुबशाहाला तिच्याशीच लग्न करायचे होते, पण घरचे तर तयार नव्हते. कुतुबशहाने तिचं धर्मांतर करून तिचं नाव ठेवलं हैदर बेगम. लग्नानंतर काही वर्षातच ती वारली. राजाचं आपल्या बायकोवरचं प्रेम आणि ती अशीच सगळ्यांच्या आठवणीत अमर राहावी म्हणून भाग्यनगरीचं नाव झालं हैदर आबाद. तेच पुढे होऊन हैदराबाद रुळलं.

लाड बाजारही तिथूनच सुरु होतो. हैदराबाद मध्ये लाखेच्या बांगड्या आणि मोती यांचंच जवळपास सगळं मार्केट. चार मिनारच्या समोरचं जामा मस्जिद आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे एका वेळी जवळ जवळ दहा हजार लोक एकत्र नमाज पढू शकतात. उरलेली संध्याकाळ शॉपिंगमध्ये कशी संपली कळलंच नाही. दुसरा दिवस तर पूर्ण रामोजी फिल्म सिटीमध्ये हरवून गेला. २००० एकरमध्ये पसरलेली रामोजी फिल्म  सिटीचे सेट्स पाहायला दिवस पुरत नाही. रामायण महाभारतापासून ते अगदी या काळातले. त्यांनी रेल्वे स्टेशनही बनवले आहे. रामोजीमध्ये पूर्ण दिवस घालवल्यानंतर पोटातले कावळे ओरडायला लागले होते, म्हणूनच तिथूनच पुढचा टप्पा म्हणजे पॅराडाईजची बिर्याणी. हैदराबादमधली वर्ल्ड फेमस बिर्याणी.

तिसऱ्या दिवशीचा प्रवास होता कुतुबशाहाच्या नगरीत म्हणजेच गोवळकोंडा. गोवळकोंड्याला जाताना सुरुवातीला लागतं, कुतुबशहा टोम्ब म्हणजे त्याच्या पूर्ण परिवाराची कब्रिस्तान. कुतुबशहा एक पासून पाचवा कुतुबशहापर्यंत सगळ्यांच्या कबरी तिथे होत्या. पहिला कुतुबशहा हा पर्शियन होता म्हणून तुम्ही ज्या काही टोम्ब पाहाल त्या पर्शिअन, हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीला प्रमाणित धरून बनवल्या गेल्या आहेत.  त्यावेळी राजा आपल्या मरणापूर्वीच आपली टोम्ब बनवत असे. शिवाय प्रत्येक टोम्ब शेजारी एक मस्जिद, त्यांच्या मरणानंतर दफनापूर्वीची शेवटची  नमाज तिथे पढली जायची पण त्यानंतर तिथे पुन्हा कधी नमाज पढली जात नसे. टोम्बच्या आत डायमंड कटचे  आकार  व घुमट होते. तिथे एकदा आवाज दिल्यावर जवळ जवळ बत्तीस वेळा घुमत असे, आणि आताही किमान सात ते आठ वेळा घुमत असे. हा घुमणारा आवाज दाखवण्यासाठी गाईडने तिथे अल्लाहू अकबर इतक्या सुरात आणि मोठ्या आवाजात म्हटलं की पूर्ण टोम्ब मध्ये त्याचा आवाज घुमून मनाला प्रसन्न करत होता. राज परिवारांच्या कबरींबरोबरच तिथे राजाचे डॉक्टर, आर्मीचे वरिष्ठ अधिकारी, नर्तिका यांच्याही कबरी होत्या, या हेतूने की त्यांनाही मानाचं स्थान मिळावं.

गोवळकोंडा फोर्ट आणि लोकांची घरं एकाच तटबंदीला लागून आहेत. गोवळकोंड्यामध्ये पाहण्यासारखं म्हणजे दिवानेआम, दिवानेखास. गोवळकोंड्यावरून हैदराबादचं दृश्य खूपच सुंदर दिसतं. जवळून वायरींच्या जाळ्यात अडकलेलं वाटणारं हैदराबाद गोवळकोंड्याच्या उंचीवरून तितकंच सुंदर वाटतं.

प्रत्येकशहर,प्रत्येक ठिकाण आपलं एक वेगळं अस्तित्व उमटवत असतं. हैदराबादने त्याच्या इतिहासात तिथेच खिळवून ठेवलं आणि हैदराबादच्या अनोळखी वाटांनी मला कधी आपलंस केलं कळलंच नाही.

(To be continued…)